सहायक पोलीस निरीक्षक पंकज दाभाडे याच्या टीम च्या धडक कार्यवाही 92,629 रुपयांचा मुद्देमाल, तर पाच आरोपीला अटक

0
803
Google search engine
Google search engine

सहायक पोलीस निरीक्षक पंकज दाभाडे याच्या टीम च्या धडक कार्यवाही
92,629 रुपयांचा मुद्देमाल, तर पाच आरोपीला अटक

चांदुर बाजार बादल डकरे

चांदुर बाजार पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या गावामध्ये सुरू असलेल्या अवैध धंद्यावर चांदुर बाजार पोलीस ही ऍक्शन मध्ये आले असल्याचे दिसत आहे त्यांनी 5 दिवसात जवळपास लाख रुपयांचा मुद्देमाल आणि 5 आरोपीला अटक केली आहे.त्याच्या कार्यवाही मुळे अवैध धंदे वाले याना चांगलीच चपराक बसली आहे.
यात 25/12/2019 रोजी चे दुपारी एक च्या दरम्यान सहायक पोलीस निरीक्षक पंकज दाभाडे यांच्या टीम ला मिळालेल्या गोपनीय माहिती प्रमाणे चांदुर बाजार येथील शिवाजीनगर भागात शेख अनिस शेख छोटू वय 25 वर्ष, याच्या राहत्या घरी जाऊन छापा टाकला असता अवैध शासन प्रतिबंधीत गुटखा, तंबाखू, पान मसाला एकूण 231 पॅकेट किंमत 20, 934/- रुपयाचा अवैध प्रतिबंधीत माल मिळून आल्याने सदर माल ताब्यात घेऊन अन्न व औषध प्रशासना मार्फत योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात आली.

तर त्याच दिवशी 25 डिसेंबर ला काझी पुरा या ठिकाणी गुप्त माहिती च्या आधारे जुगार वर रेड केली असता यात आरोपी वसीम खान नासीर खान रा.सैफी नगर याला अटक करून त्याच्या कडून 22290 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
दि. 30/12/2019 रोजी चे सकाळी 9.15 वा. चे दरम्यान गोपनीय खबरेप्रमाणे चांदुर बाजार ते शिरजगाव बंड या रोडवर नाकाबंदी केली आता काळ्या करड्या रंगाची मोटार सायकल क्र. MH27 CH 1654 यावरन देशी दारूची वाहतूक होत असताना पोलिसांच्या लक्षात आले त्यावरून त्यांनी या कार्यवाही मध्ये आरोपी
1) राहुल रामकृष्ण हरडे, वय 32, रा. शिराळा, ता. जि. अमरावती.
2) संतोष किसनराव गुगलमाने, वय 19 वर्ष, रा. शिराळा, ता. जि. अमरावती.
हे अवैध विनापरवाना बॉबी संत्रा देशी दारूच्या ऐकून 96 नग पावट्या वाहतूक करताना मिळून आल्याने 96 नग देशी दारूच्या पावट्या व पिशवी किंमत 5765 रुपये व मोटार सायकल किंमत 35000 असा ऐकूण 40765/- रुपयाचा माल जप्त करण्यात आला… दारू बंदी कालमानव्यये गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन्ही आरोपीना अटक करण्यात आली होती
आज दि. 30/12/2019 रोजी चे सकाळी 9.45 वा. चे दरम्यान गोपनीय खबरेप्रमाणे शिरजगाव बंड येथे साजन रमेश मोहोड, वय 26 वर्ष यांच्या राहत्या घरी प्रोव्ही रेड केली असता आरोपिला पोलिसांची चाहूल लागताच पळून गेला त्याच्या घरी अवैध विनापरवाना बॉबी संत्रा देशी दारूच्या ऐकून 144 नग पावट्या विक्री करताना ठेऊन असल्याचे मिळून आल्याने 144 नग देशी दारूच्या पावट्या किंमत 8640/- रुपयाचा माल जप्त करण्यात आला… दारू बंदी कालमानव्यये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर त्याचा शोध पोलीस घेत आहे.
या कार्यवाही अचलपूर उपविभागीय पोलीस अधिकारी पोपट अबदगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार उदयसिंह साळुंखे, सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज दाभाडे, सहायक पोलिस निरीक्षक तेजस्वीनि गिरसावडे,पोलीस उपनिरीक्षक गजानन रहाटे, पोलीस कॉस्टबल पंकज फाटे,महेश काळे यांनी केली.

बॉक्समध्ये
“दै. दिव्य मराठी ने अवैध दारू आणि अवैध धंदे बाबत वृत्त प्रकाशित केल्यानंतर पोलीस विभाग ऍक्शन मध्ये आले मात्र राज्य उत्पादन शुल्क का कार्यवाही करीत नाही हा प्रश्न आहे.”

*चांदुर बाजार तालुक्यातील अनेक ग्रामीण भागात शिराळा या ठिकाणावरून अवैध देशी दारू चा पुरवठा केला जातो अशी गुप्त माहिती आहे तर ग्रामीण पोलिस अधीक्षक कार्यलाय मधील स्थानिक गुन्हे शाखेच्या अनेक अधिकारी यांना माहिती असून देखील त्याच्या चुप्पी मुळे नेमकं प्रकरण कोठे दडपले जात आहे कळत नाही आहे.*