पहिल्यांदा अमरावती जिल्ह्यात दोन मंत्री पद

0
834

अमरावती :- नुकताच राज्याच्या महाआघाडी सरकारने, प्रादेशिक समतोल साधत मंत्रीमंडळाचा विस्तार केला आहे.या विस्तारात पक्षिय समतोल ही राखण्यात आला आहे. हे सर्व साधत असताना राज्य सरकार कडून, जिल्ह्याला दोन मंत्रीपदे देण्यात आली आहेत. अमरावती जिल्ह्याला प्रथमच, एकाचवेळी दोन मंत्री मिळाले आहेत. ही जिल्ह्यासाठी अभिमानाची व आनंदाची बाब आहे. या आधी राज्य मंत्री मंडळात, माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, अँड. यशवंतराव शेरेकर, सुरेन्द्र भुयार, अनिल वर्‍हाडे, हर्षवर्धन देशमुख, जगदीश गुप्ता,विनायकराव कोरडे, वसुधाताई देशमुख, डॉ.सुनील देशमुख, प्रवीण पोटे, डॉ. अनिल बोंडे, इत्यादींनी मंत्री म्हणून अमरावती जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केले आहे. यावेळी राज्याच्या नव्या महाआघाडीत सरकारने, कॅबिनेट मंत्री म्हणून यशोमती ठाकूर व राज्यमंत्री म्हणून बच्चू कडू यांना अमरावती जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करण्यासाठी संधी दिली आहे. आता या दोघांना जिल्ह्यासह, आपल्या खात्यांचा राज्याचाही कारभार सांभाळावा लागणार आहे. नव्यानेच मंत्री झालेले हे दोघेही मंत्री पदासाठी नवखे असले तरी , तीन व चार वेळा आमदार झाल्याने राजकीय व प्रशासकीय कामाचा दांडगा अनुभव यांना आहे. तसेच दोन्हीही लोकप्रतिनिधी डॅशिंग आहेत. यांनी रस्त्यांवर येऊन, जनतेच्या प्रश्नांसाठी जनआंदोलने सुध्दा केली आहेत. त्यामुळे या दोन्ही विद्यमान मंत्र्यांना, सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांची चांगलीच जाण आहे. यांनी लोकप्रतिनिधी असतानाच लोकांसाठी कामे केलीत. आता मंत्रीपदावरून हे दोघेही जिल्ह्यातील लोकांसाठी चांगल काम करतील,असा जिल्ह्यातिल सर्वसामान्य नागरिकांना विर्श्‍वास आहे. त्यामुळे या दोघांनीही मंत्रीपदाची शपथ घेताच, जिल्हाभर लोकांच्या आनंदाला उधाण आले होते. या दोघांच्या मंत्री होण्याचा आनंद फक्त काँग्रेस व प्रहारच्याच कार्यकर्त्यांना झाला नाही, तर अमरावती जिल्ह्यातील सर्व साधारण नागरीकांनाही झाल्याचे दिसून येते. या दोन्ही मंत्र्यांना अमरावती जिल्ह्याच्या प्रश्नांची व नागरिकांच्या समस्यांची पुरेपूर जाण आहे. यांच्या मंत्री होण्याने जिल्ह्याच्या, शेतकर्‍यांच्या व नागरिकांच्या, अनेक वर्षांपासून रेंगाळत असलेल्या समस्या पूर्णत्वास जातिल. तसेच यांच्या आजवरच्या दमदार कामाच्या अनुभवाचा फायदा, मंत्री पदावरून राज्याच्याही जनतेला होईल. असा ठाम विश्‍वास जिल्हाभरातील नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे.