चांदुर बाजार तालुक्यात अवकाळी पावसाचा जोर कायम बेलोरा महसूल मंडल मध्ये गारपीट

0
774
Google search engine
Google search engine

चांदुर बाजार :-  प्रतिनिधी

चांदूरबाजार तालुक्यात सतत दोन दिवसांपासून रात्रीच्या वेळेला पावसाने आपली हजेरी लावली असल्यानें  तालुक्यातील बगायती पिकांना याचा धोका असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पिकांमध्ये सामान्यता कापूस , तूर, कांद्याचे रोप, संत्रा, केळी भाजीपाला इत्यादीचा समावेश आहे .

दिनांक 1 जानेवारी 2020 ला झालेल्या मध्यरात्रीच्या दरम्यान वादळ यामुळे तालुक्यात कुठे नुकसान झाल्याची माहिती प्रशासनाकडून मिळाली नाही तर रात्री चारच्या दरम्यान झालेल्या अवकाळी पावसामुळे  पिकांना धोक्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र या पावसामुळे तालुक्यातील कोणत्याही भागात फारसे नुकसान झाले नसल्याचे दिसत आहे तसेच ढगाळ वातावरण पावसाचा तडाखा या थंड वातावरणामुळे ग्रामीण भागामध्ये अनेक ठिकाणी शेकोटी तयार झाले. असल्याचे दिसत आहे तर चांदुर बाजार तालुक्यातील मध्यप्रदेश मधून वाहणार्‍या वाहणार्‍या मधून वाहणार्‍या वाहणार्‍या मेघ नदीला सुद्धा काही प्रमाणात पूर आल्याने या गावातील नागरिकांनी उन्हाळ्यामध्ये केलेले श्रमदान खोदलेले खड्डे यामुळे पुन्हा खड्डे भरून निघाले आहे तर नदीही तर नदीही निघाले आहे तर नदीही आहे तर नदीही वाहून निघत आहे.

चांदुर बाजार तालुक्यातील महसूल मंडळ  मंडळनिहाय पर्जन्यमान दि 31.12.2019 रोजी 1)चांदूर बा. 40.10, 2)बेलोरा 36.20, 3) तळेगांव मो.28.00, 4)ब्राह्मणवाडा थडी.28.00, 5)सिरजगाव कसबा 9.00, 6)करजगाव…   7.10, 7)आसेगाव.8.20 एकूण पर्जन्यमान…  156.60,सरासरी पर्जन्यमान…  22.37 इतकी नोंद करण्यात आली तर नवीन वर्षाच्या सुरुवातीला चांदुर बाजार तालुक्यातील महसूल मंडळनिहाय पर्जन्यमान
1)चांदूर बा. 15.00, 2)बेलोरा 38.00, 3)तळेगांव मो.16.00, 4)ब्राह्मणवाडा  थडी 12.00, 5)सिरजगाव कसबा 12.00 , 6)करजगाव.8.30, 7)आसेगाव 11.00
एकूण पर्जन्यमान.112.30 सरासरी पर्जन्यमान.16.04 इतकी नोंद करणयात आली आहे.

प्रतिक्रिया तहसीलदार:-
सतत दोन दिवसात झालेल्या पावसामुळे तालुक्यातील ग्रामीण भागात थंड वातावरण आहे तर दिनांक 1 जानेवारी ला झालेल्या पावसामुळे कोठेही नुकसान ची माहिती प्राप्त नाही मात्र बेलोरा महसूल मंडळ मध्ये गारपीट झाली असून त्या भागातील पिकाचे अंशतः नुकसान झाले आहे.तसा अहवाल तलाठी कडून प्राप्त झाला आहे.
उमेश खोडके तहसीलदार चांदुर बाजार