मा.दुग्ध व पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांची अडगाव खु.येथे सभा

0
1352
Google search engine
Google search engine
  • आकोटः प्रतिनिधी

माजी दुग्ध व पशुसंवर्धन मंत्री आ.महादेव जानकर हे रासप उमेदवारांच्या प्रचारार्थ दि.४ जाने रोजी अकोला जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. रासपचे अकोला जिल्हाध्यक्ष सतिष हांडे यांनी महादेव जानकर यांच्या या दौऱ्याबाबत कळवले आहे. मुंडगाव जिल्हा परिषद गटातील पं.समिती अडगाव खुर्द सर्कलच्या रासपच्या उमेदवार सौ. उषा बाबुराव गवई यांच्या प्रचारार्थ माजी मंत्री महादेव जानकर यांची अडगाव खुर्द येथे दिनांक ०४ जाने/२०२० रोजी दुपारी ४ वाजता “जाहीर सभा” आयोजित करण्यात असल्याचं जिल्हाध्यक्ष सतीश हांडे यांनी कळवले आहे.महादेव जानकर हे या सभेनंतर राजंदा पंचायत समिती सर्कल ता. बार्शीटाकळी येथील रासपचे उमेदवार स्वप्निल लक्ष्मण उपकारे यांच्यां प्रचारार्थ राजंदा येथे प्रस्थान करणार आहेत.