जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत चांदूर रेल्वे आयटीआय “चॅम्पीयन”- रांगोळी स्पर्धेत, उंची उडीत व रनींग स्पर्धेत प्रथम तर लांब उडीत चांदूर रेल्वे तृतीय

0
641
Google search engine
Google search engine

चांदूर रेल्वे – (शहजाद खान)

अमरावती औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्रांगणात जिल्हास्तरीय क्रीडा, रांगोळी स्पर्धा, तंत्र प्रदर्शन २०२० जिल्हास्तरीय आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी चांदूर रेल्वे आयटीआयचा बोलबाला यामध्ये पहावयास मिळाला असुन कबड्डी स्पर्धेत चांदूर रेल्वे आयटीआयची चमु चॅम्पीयन ठरली असुन याशिवाय रांगोळी स्पर्धेत, उंची उडी व १०० मीटर रनिंग स्पर्धेत प्रथम तर लांब उडीत चांदूर रेल्वे आयटीआयचा विद्यार्थी तृतीय आला आहे.

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील प्रशिक्षणार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकरिता क्रीडास्पर्धा व तंत्र प्रदर्शन यासारखे प्रशिक्षण पूरक उपक्रम राबविण्याबाबत व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षणाच्या संचालकांनी सूचना दिल्या होत्या. प्रथम संस्था स्तरावर उपक्रम राबविण्याचे सांगण्यात आले होते. त्यानुसार चांदूर रेल्वे आयटीआय मध्ये क्रिकेट व व्हॉलीबॉल स्पर्धांचे आयोजन शनिवार २१ डिसेंबरपासुन करण्यात आले होते. या स्पर्धेत उत्कृष्ट चमक दाखविणाऱ्या खेळाडूंची निवड जिल्हास्तरासाठी झाली होती. २ जानेवारीपासुन अमरावती आयटीआयमध्ये जिल्हास्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये ३ जानेवारीला झालेल्या फायनल कबड्डी मॅचमध्ये चांदूर रेल्वेची चमु अजिंक्य ठरली आहे. तर मोझरी आयटीआय उपविजेता ठरला. कबड्डीच्या चमुमध्ये क्षितीज चिकटे, प्रज्वल घाटोळे, तेजस देशमुख, केतन ठाकरे, गुलशन राठोड, आकाश मेहर, ओम शेलार यांचा समावेश होता. याशिवाय रांगोळी स्पर्धेत चांदूर रेल्वेची इलेक्ट्रीशीयन ट्रेडची विद्यार्थीनी शिवानी मडघे हीने तंत्र विषयावर काढलेली रांगोळी प्रथम आली आहे. तर उंच उडीत इलेक्ट्रीशीयन ट्रेडचा गौरव भरडे व १०० मीटर रनींग स्पर्धेत वायरमन ट्रेडचा तेजस देशमुख प्रथम तर लांब उडीत वेल्डर ट्रेडचा शुभम इंगोले तृतीय आला आहे. कबड्डीची चमु, रनींग, रांगोळी, उंच उडी स्पर्धेत विजयी विद्यार्थी यांची ७ जानेवारी ते ९ जानेवारी या कालावधीत अमरावती येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे होणाऱ्या विभागस्तरीय स्पर्धांकरिता निवड झाली आहे. तर यामध्ये विजयी होणाऱ्यांची निवड १६ जानेवारी ते १८ जानेवारी या कालावधीत औरंगाबाद येथे होणाऱ्या राज्यस्तरीय क्रिडा स्पर्धांकरिता करण्यात येणार आहे. प्रशिक्षणार्थ्यांच्या या घवघवीत यशाबद्दल त्यांचे चांदूर रेल्वे आयटीआयचे प्राचार्य एस. एस. पाटबागे, गटनिदेशक डि.टी. शिंगणे, शिल्प निदेशक एच. यु. चांदुरकर, एन. एन. वसुले, के. के. सिसोदे, मारोती मर्दाने, पी. डी. पाचपोर, डी. एन. दहापुते, एस. एन. ठाकरे, कैलास चौधरी, कु. जे. के. रंगारी, शहजाद खान, सुरज चांदूरकर, एस. टी. बेहेरे, सुमीत वलीवकर, गजानन भडांगे, भुषण खेडकर, प्रशांत टांगले, एल. पी. शेलोकार, एस. एस. कांबळे, एस. व्ही. निमकंडे, कर्मचारी सौ. आत्राम, नंदकिशोर शेळके, राठोड, कनोजे, सारवाण, पाटील, वाघमारे, सावंत, मोहोड आदींनी कौतुक केले आहे.