चंद्रकांत पाटिल झोप आहे म्हणुन स्वन पडले – राऊत

0
397

उस्मानाबाद / प्रतिनीधी

काँग्रेसमधून शिवसेनेत गेलेले आमदार अब्दुल सत्तार यांनी राज्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. कॅबिनेट मंत्रिपदाची आशा असताना पदरी पडलेलं राज्यमंत्रिपद आणि औरंगाबाद जिल्हा परिषद अध्यक्षपदावरुन अब्दुल सत्तार गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेवर नाराज होते. या नाराजीतूनच सत्तार यांनी राज्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला असल्याची माहिती आहे. त्यांच्या या राजीनाम्यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

अब्दुल सत्तारांनी राजीनामा का दिला माहित नाही, जेव्हा मंत्री राजीनामा देतो तेव्हा तो मुख्यमंत्र्यांकडे जातो किंवा राजभवनात जातो, अब्दुल सत्तारांनी राजीनामा दिला की नाही याबाबतचं सत्य मुख्यमंत्री किंवा राजभवन सांगू शकतात. मुख्यमंत्र्यांनी सत्तारांचा पूर्ण सन्मान राखून त्यांना मंत्री बनवले आहे. अशा छाेट्या घटना हाेत राहतात. जे नाराज हाेतायत ते मुलत: शिवसैनिक नाहीत, बाहेरच्या पक्षातून शिवसेनेत आल्यानं इथल्या सिस्टिममध्ये अॅडजस्ट व्हायला वेळ लागेल असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

दरम्यान शिवसेना नेते दीपक सावंत यांनी नाराजी व्यक्त केली आहे. पक्षाकडून कोणतंही काम दिलं जात नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. यावरही संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. दीपक सावंत हे खूप जुने जाणते शिवसैनिक आहेत. ते भेटले त्यांच्याशी चर्चा केली आणि त्यांना सांगितले की तुमच्या भावना पक्षप्रमुखांपर्यंत पाेहचवेन असं राऊत म्हणालेत.

चंद्रकांत पाटलांवर टीका

चंद्रकांत पाटील झाेपेत असावेत, म्हणून त्यांना अशा प्रकारची स्वप्नं पडत असावीत. आघाडी सरकारमध्ये सुरूवातीला असे धक्के बसतात, नंतर गाडी सुरू झाल्यावर ती सुसाट धावते.खातेवाटपात शिवसेना किंवा राष्ट्रवादीचा कुठलाही घाेळ दिसत नाही. कुठलंही खातं कमी जास्त नाही.
छात्र भारतीच्या कार्यक्रमाबाबत आदित्य ठाकरेंनी भूमिका स्पष्ट केलीय, की त्यांना याबाबतीत काहीच माहिती नाही.