जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते होणार नीलेश म्हसायेंच्या वारी भैरवगड पुस्तकाचे प्रकाशन

0
1296
Google search engine
Google search engine

आकोटःसंतोष विणके

तीन जिल्ह्यांच्या सीमेवर असणारे प्रसिद्ध ऐतिहासिक व धार्मिक स्थळ असलेले वारी भैरवगड वरिल दुर्मिळ माहिती असलेल्या निलेश म्हसाये लिखित पुस्‍तकाचे प्रकाशन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते संपन्न होत आहे रविवार दिनांक १२ जानेवारी २०२०
सकाळी ११:३० वाजता समर्थ धाम वारी भैरवगड संस्थान येथे हा प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला आहे.नीलेश म्हसाये यांचे हे पुस्तक दुर्गा प्रकाशन(पुणे) द्वारा प्रकाशित करण्यात येत असुन निलेश म्हसाये हे नव्या दमाचे कवि आहेत. पुणे येथे त्यांनी विदर्भ सहयोग मंडळाची बांधणी केलीआहे


.या प्रकाशन सोहळ्याला श्री प.पु. कृष्णानंद भारती महाराज(महंत) मा.श्री विवेक चांदूरकर( उपसंपादक -तथा इतिहास अभ्यासक) .सौ नयनाताई मनतकार( मा. जिल्हा परिषद सदस्या ) मा.श्री विजय पाटील(ज्येष्ठ साहित्यिक ) मा.श्री नरेंद्र इंगळे(ज्येष्ठ साहित्यिक ) मा.श्री अनिल गावंडे(अध्यक्ष – लोकजागर मंच) मा.कॅप्टन सुनिल डोबाळे(सेवा निवृत्त सैन्याधिकारी तथा सामाजिक कार्यकर्ते) मा.श्री सुरेशराव देशमुख (अध्यक्ष – वारी संस्थान) मा.श्री प्रविण पोटे (कोशाध्यक्ष – छत्रपती शाहू शिक्षण संस्था, अकोट) यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.