अकोटात लष्करातुन निवृत्त झालेल्या कमांडोची सपत्निक जंगी मिरवणुक

0
3562
Google search engine
Google search engine

मिलट्रीवाल्यांच्या जलव्यानी शहरवासी मंत्रमुग्ध

देशभक्तीपर गीतांसह भारत माता की जय चा नारा

आकोटःसंतोष विणके

सैन्यदलातील लष्करातुन निवृत्त झालेल्या अकोट शहरातील भूमिपुत्र देवेंद्र अशोक पायगन या पॕरा कमांडोची यशस्वी देशसेवा करुन दि.४ जाने.रोजी मायभूमीत परत आल्याबद्दल सपत्निक जंगी मिरवणुक काढण्यात आली

देवेंद्र पायगन यांची जम्मू काश्मीर आसाम गुजरात राजस्थान दिल्ली आदी ठिकाणी आपली लष्करी सेवा दिली ते उदमपूर येथे 31 RR बटालियन मध्ये प्यारा कमांडो होते.2002 मध्ये सैन्यात रुजु होउन 2019 निवृत्त झाले.17 वर्ष भारताची सेवा करून 31/12/2019 रोजी सन्मानाने वयाच्या अवघ्या ३७ व्या वर्षी सेवा करून मायदेशी परतले यानिमित्त अकोट शहरात मध्ये त्यांची भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीचा समारोप अप्पास्वामी कॉलनी येथे करण्यात आला.यावेळी देवेंद्र व   पत्नी सौौ दुर्गा पायगन यांच्यासह त्यांचा भव्य सपत्नीक सत्कार संभारभ ठेवण्यात आला होता.देवेंद्र यांना स्पेशल सर्विस मेडल जम्मू-काश्मीर सुरक्षा मेडल सैनिक सेवा मेडल जम्मू अँड काश्मीर मेडल 2009, सैनिक सुरक्षा मेडलने सन्मानित करण्यात आले आहे. यावेळी त्याचे सासरे
हरिराम तुळशीराम सोळंके सौ,सुनीता हरिराम सोळंके व देवेंद्र यांची आई विमल अशोक पायगन बहीणी ज्योती भास्कर हीस्सल व उर्मिला गजानन हेंद यांच्यासह मित्रमंडळ अनिल धर्मे,विशाल भगत ,नील सिंग राणे दशरथ डाबेराव संतोष चव्हाण पवन राने करण सोळंके योगेश राणे शिव सिंग सोळंके पप्पू डाबेराव विजय लिल्लरे प्रज्वल खावले पवन कुचेकर रोशन कुचेकर बजरंग मिसळे ऋषभ कुचेकर आदित्य लावणे किरण चिंचोळकर अनिकेत माने आकाश वर्मा विकी कुचेकर पद्माकर कुचेकर केशव अंबाळकर निलेश पायघन व जय भोले ग्रुप जय गजानन शिवभक्त मंडळ विराट प्रतिष्ठान व रामटेक पुरा तथा मोठे बारगण व अप्पा स्वामी कॉलनी येथील मित्र परिवाराच्या उपस्थीती होती.