विद्यार्थी मृत्यू प्रकरणी मुख्याध्यापक व अधीक्षक निलंबित

505
जाहिरात

अमरावती:-  टिटंबा येथील आदिवासी आश्रमशाळेतील एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्या प्रकरणी शाळेचे मुख्याध्यापक व वसतिगृह अधीक्षक यांना प्रशासनाने तातडीने निलंबित केले आहे.

या प्रकरणी आणखी चौकशी करून त्यानुसार जबाबदार संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे प्रकल्प अधिकारी मिताली सेठी यांनी सांगितले.

राकेश रामकरण जावरकर (वय १५) असे या विद्यार्थ्याचे नाव असून, तो नववीचा विद्यार्थी होता. तो नागझिरा येथील रहिवासी होता.
प्राप्त माहितीनुसार, आज रविवार सुट्टीचा दिवस असल्याने विद्यार्थी शाळेच्या पटांगणात खेळत होते. सदर विद्यार्थी तेथील झाडावर चढला असताना विजेच्या तारांचा स्पर्श होऊन कोसळून झाडात अडकला. हे कळताच तत्काळ वीज फीडर बंद करण्यात आले. रुग्णवाहिका, वैद्यकीय पथक, पोलीस पथक पाठवण्यात आले. तथापि, दुर्दैवाने विद्यार्थ्याचा मृत्यू झाला.

याप्रकरणी मुख्याध्यापक व अधिक्षकावर निलंबनाची कारवाई केली आहे. अधिक सखोल चौकशी करून जबाबदार संबंधितांवर कारवाई केली जाईल. त्याचप्रमाणे, विद्यार्थ्यांच्या कुटूंबियांना सर्वतोपरी मदत केली जाईल, असे श्रीमती सेठी यांनी सांगितले.

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।