निवडणूक मतमोजणी मुळे अकोट-पोपटखेड मार्गावरील वाहतुकीत बदल

0
827
Google search engine
Google search engine

अकोट: ता.प्रतिनिधी

जिल्हा परीषद व पंचायत समीती सार्वत्रिक निवडणुक मतमोजणीमूळे उद्या दि.८ जानेवारीला ‘ शहरातून पोपटखेड रोड कडे जाणाऱ्या वाहतुकीत प्रशासनाच्या वतीने बदल करण्यात आला आहे . ७ जाने. रोजी जिल्हा परीषद व पंचायत समीती साठी मतदान आहे तर दुसऱ्या दिवशी 8 जानेवारी रोजी औदयोगिक प्रशिक्षण संस्था (आय टी आय) पोपटखेड रोड अकोट येथिल ट्रायसेम सभागृह मधे मतमोजणी होणार आहे.त्यामूळे या दिवशी सदर परीसरात मोठ्या प्रमाणावर हजारोंची गर्दी राहणार असल्याने दि.08 जाने. रोजी सकाळी 06/00 वाजता ते मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत अकोट ते पोपटखेड रोड वरील वाहतुक कायदा व सुव्यवस्थेच्या कारणामुळे उपविभागीय अधिकारी अकोट यांचे आदेशाने ग्राम मोहाळा येथून अकोलखेड _अकोली जहागिर ते अंजनगाव रोड अशी वळविण्यात येत आहे.तरी सदर रोडवरील प्रवाश्यांंनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आव्हान पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे