आकोट तालुक्यात ग्रामीण भागात चुरशीचे मतदान

0
949
Google search engine
Google search engine

जि.प.मतदानासाठी मतदारांची गर्दी

उद्या बुधवारी होणार मतमोजणी

अकोटःसंतोष विणके

अकोला जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या अकोट तालुक्यातील गट व गणांसाठी आज मंगळवारी मतदान झाले. अकोट तालुक्यातून मिनी मंत्रालया वर लोकप्रतिनिधींच्या निवडीसाठी ग्रामीण भागात सकाळपासूनच नागरिक मतदानासाठी बाहेर पडले होते. दुपारी 3 वाजेपर्यंत तालुक्यात 45•49 टक्के मतदान झाले होते तर अंतिम मतदानाची टक्केवारी ही उशिरा प्राप्त होणार असून 70% च्यावर मतदान होणार असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या निवडणुकीत तालुक्यातील अकोली जहागीर, अकोलखेड, उमरा, कुटासा,आसेगाव, मुंडगाव,चोहट्टा बाजार ,वरूर जऊळका हे ८ जिल्हा परिषद गट तर अकोली जहागीर ,पणज, वडाळी देशमुख,अकोलखेड ,मोहाळा, पिंप्रि खुर्द, उमरा, मुंडगाव, अडगाव खुर्द, कुटासा, रेल, आसेगाव बाजार, चोहट्टा बाजार, रौंदळा, केळीवेळी,वरूर जऊळका या १६ पंचायत समिती गणांसाठी मतदान पार पडुन उमेदवारांचे भाग्य ईव्हीएम मध्ये बंद झाले आहे.या निवडणुकीतील उमेदवारांच्या भाग्याचा फैसला हा उद्या ८ जानेवारीला सकाळी होणार आहे. अकोट तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती नवनिर्वाचित उमेदवारांच्या मतांची मोजणी ही पोपटखेड रोड मार्गावरील आयटीआयच्या सभागृहात पार पडणार आहे यंदाच्या निवडणुकीत राज्यस्तरावर बदललेल्या समीकरणामुळे अनेक ठिकाणी चुरशीच्या लढती बघायला मिळण्याची शक्यता वर्तवली जाते त्याशिवाय पक्षामधून विविध इच्छुक उमेदवारांनी केलेली बंडखोरी नेमके कुणाचे चित्र पालटवेल हे पाहणे ठरणार आहे

अकोल्या जिल्ह्याच्या मिनी मंत्रालयावर कुणाचा झेंडा फडकविला जाणार हे कळण्यास आता अवघ्या काही तासांचा अवधी शिल्लक राहिला आहे या निवडणुकीत प्रहार शिवसेनेची युती तर काँग्रेस व राष्ट्रवादी हे आघाडी करून लढले होते तर भाजप व वंचित बहुजन आघाडी हे स्वतंत्रपणे निवडणूकीला सामोरे गेले होते गेल्या दोन दशकांपासून अकोला जिल्हा परिषदेवर वंचित आघाडीची सत्ता असून ती यावेळीही कायम राहते की नाही हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे निवडणूक मतदान शांततेत पार पडण्यासाठी महसूल तथा निवडणूक विभागातील अधिकारी कर्मचारी यांनी परिश्रम घेतले अकोट ग्रामीण पोलिसांनी यावेळी चोख बंदोबस्त ठेवला होता