“निष्ठा”अंतर्गत १६३ शिक्षकांचे प्रशिक्षण पूर्ण. *समारोपिय कार्यक्रमात,८२ महिला शिक्षिका संन्मानित. चांदूरबाजार/प्रतिनिधी

0
418
Google search engine
Google search engine

“निष्ठा”अंतर्गत १६३ शिक्षकांचे प्रशिक्षण पूर्ण.
*समारोपिय कार्यक्रमात,८२ महिला शिक्षिका संन्मानित.
चांदूरबाजार/प्रतिनिधी
तालुक्यातील पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या,जि.प. व न.प.शाळांमधिल केंद्र प्रमुख, मुख्याध्यापक व शिक्षकांचे तिन दिवसिय प्रशिक्षण नुकतेच संपन्न झाले.तालुक्यातिल ५०४ शिक्षकांना तिन टप्प्यात प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यात”निष्ठा”योजने अंतर्गत १६३शिक्षकांना पहिल्या टप्प्यातील प्रशिक्षण देण्यात आले आहे.सदर प्रशिक्षण भक्तिधाम मधिल, ज्ञानोदय विद्या मंदिर येथे संपन्न झाले.
या प्रशिक्षण वर्गाचा समारोप सोहळा, योगायोगाने सावित्रीबाई फुले जयंती दिनी आला.त्यानिमित्य सावित्रीबाईंची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.विषेश म्हणजे या जयंती उत्सवाचे आयोजन, प्रशिक्षण वर्गातील महिला शिक्षिकांनीच केले.याप्रसंगी प्रशिक्षण वर्गातील ८२ महिला शिक्षिकांना, गुलाबपुष्प देऊन गौरविण्यात आले.प्रशिक्षण वर्गातील या जयंती सोहळ्याचे अध्यक्षस्थान श्रीमती राव यांनी भूषविले.अतिथी म्हणून श्रीमती खांडे, श्रीमती इंगोले,तज्ञ मार्गदर्शक जयश्री धोटे, मनिषा वैद्य, तृप्ती इंगळे,फरहीन खान इत्यादी हजर होत्या.
कार्यक्रमाचे संचलन व आभार प्रदर्शन,वृशाली देशमुख यांनी केले.या प्रशिक्षण वर्गाला शिक्षकांना, डायसचे अधिव्याख्याते विलास कडाळे,तज्ञ मार्गदर्शक मनोज श्रीखंडे, रविन्द्र काळपांडे यांनी प्रशिक्षण दिले.