बहिरमच्या रिंगण सोहळ्याला वारकऱ्यांची मांदियाळी; 50 हजार वारकऱ्यांची रिंगण सोहळ्याला उपस्थिती,तर यात्रेला 70 ते 80 हजार नागरिकांची गर्दी

0
773
Google search engine
Google search engine

बहिरमच्या रिंगण सोहळ्याला वारकऱ्यांची मांदियाळी;
50 हजार वारकऱ्यांची रिंगण सोहळ्याला उपस्थिती,तर यात्रेला 70 ते 80 हजार नागरिकांची गर्दी

चांदूर बाजार–

वारकरी संप्रदायामध्ये रिंगण सोहळ्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. हा रिंगण सोहळा विदर्भामध्ये बहिरम या तीर्थक्षेत्री गेल्या ३ वर्षीपासून सुरू आहे. त्यामुळे वारकऱ्यांसाठी ही एक पर्वणीच असते. या आनंदोत्सवाला विदर्भभरातुन वारकऱ्यांची मोठी मांदियाळी जमली होती. अश्वाच्या पायाखालील माती मस्तकी धारण करण्यासाठी तसेच ती माती घरी नेऊन तुळशीवृंदावनात ठेवण्यासाठी ५० हजार वारकऱ्यांनी अश्वाच्या रिंगण सोहळ्याला बहीराम मध्ये हजेरी लावली.
यावेळी बहीरम बाबाच्या मंदिरात संस्थेच्या अध्यक्षांच्या हस्ते रिंगण सोहळातील अश्वांचे पूजन करण्यात आले. तेथून सर्व पालख्या दिंडी मार्गाने “जय जय राम कृष्ण हरी” च्या गजरात ज्ञानेश्वर माऊलींचा जयघोष करत बहिराम मधील बैतूल मार्गावरील रिंगण सोहळ्याच्या ठिकाणी पोहोचली. या ठिकाणी पालखी सोहळ्यासाठी आलेल्या सर्व पालख्यांचे व अश्वाचे पूजन करण्यात आले.
याप्रसंगी सर्वप्रथम पताका धारक वारकऱ्यांनी रिंगनसोहळ्यात “माऊली माऊली” च्या जयघोषात प्रदक्षिणा पूर्ण केली. त्यानंतर मृदंग वादकांनी मृदंग गळ्यात घेऊन रिंगण प्रदक्षिणा केली. त्यानंतर अश्व रिंगणाचा सोहळा सुरू झाला. चिंचोळे सरकार यांचे माऊलीच्या दोन अश्‍वांनी रिंगण सोहळ्यात पाच धाव प्रदक्षिणा पूर्ण केल्या.
अश्व रिंगणात धावताच ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम महाराजांच्या जय घोष टाळ-मृदंगाच्या साथीने आसमंतात दुमदुमला. तीस मिनिटाच्या काळासाठी बहिरम मधील पर्वतरांगा ही काही क्षणासाठी हादरली. रिंगन सोहळ्याप्रसंगी मागील वर्षीची गर्दी पाहता पोलिसांनी बंदोबस्त वाढविला होता. परंतु रिंगनसोहळ्यातील गर्दी पाहता बंदोबस्ताचा पोलीस प्रशासनावर ताण पडला नाही. दुपारी १ वाजताच्या सुमारास जमा झालेली रिंगण सोहळ्याची गर्दी सायंकाळी चारच्या सुमारास पूर्णतः ओसरली होती.
यावेळी बहिरम बाबा संस्थान चे अध्यक्ष सुरेंद्र पाटील चौधरी, किशोर ठाकरे सह संचालक मंडळाचे सदस्य उपस्थित होते. या रिंगनसोहळ्यात शिराजगाव बंड येथील गजानन सेवा समिती, लाखनवडी येथील गुणवंत महाराज यांचा पालखी सह २६ दिंड्या सहभागी झाल्या होत्या. तर हजारो वारकर्यांचा साक्षीने हा नेत्रदीपक सोहळा पार पडला.

रविवार या दिवशी रिगण सोहळा असल्याने या ठिकाणी भाविकांची तसेच नागरिकांची सुद्धा मोठ्या प्रमाणावर गर्दी पाहायला मिळाली.कायदा आणि सुव्यवस्था च्या दृष्टीने ठाणेदार गोपाल उपाध्यय यांनी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त लावला होता तर या वेळी 70 ते 80 नागरिकांची उपस्थिती असल्याची माहिती पोलीस सूत्रा कडून मिळाली.