पद आणि इमारत पेक्षा नागरिकांचे खरे समाधान हेच आपली जबाबदारी :- राज्यमंत्री बच्चू कडू पं.समितीच्या प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण

0
1190
Google search engine
Google search engine

*
चांदूरबाजार,/प्रतिनिधी
पंचायत समितीचे सर्व कामकाजाची नाळ ग्रामपंचायती व्दारे ,ग्रामिण जनतेच्या विकासासी जूळली आहे.त्यासाठी पंचायत समितीची सुसज्य अशी प्रशासकीय इमारत तयार झाली मात्र जो पर्यत इथं येणार प्रत्येक माणूस समाधानी होणार नाही तो पर्यत हे व्यर्थ आहे.असे वक्तव्य राज्यमंत्री यांनी चांदुर बाजार येथील पंचायत समिती च्या नवीन इमारत च्या लोकार्पण सोहळा वेळी केले.

१८ मे २०१७ ला ही इमारत बांधून पूर्ण झाली.परंतू उद्घाटनासाठी तत्कालीन मंत्र्यांची दिनांक व वेळ मिळत नसल्याने उद्घाटन होऊ शकले नाही.परंतू स्वत:च मंत्री झाल्याने आज नव्या प्रशासकीय इमारतीला ,लोकसेवार्थ समर्पित करण्याचा योग ना.बच्चू कडूंच्या हस्तेच जूळून आला हे विशेष.

अध्यक्षस्थानी प.स.सभापती राजेश वाटाणे यांनी भूषविले.तर प्रमुख अतिथी म्हणून,जि.प.सदस्य सूखदेव पवार, योगिता जयस्वाल,पं. स.उपसभापती नितिन टाकरखेडे,सर्व पं.स.सदस्य तथा अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.विनय ठमके,मंचावर उपस्थित होते.