चांदुर बाजार नगर परिषदने पत्रकारांचा सत्कार करून केला दर्पण दिन साजरा नगर अध्यक्ष यांचा विशेष उपक्रम ,पत्रकार यांची उपस्थिती

0
541
Google search engine
Google search engine

वर्तमानपत्र हे समाज जीवनाचा आरसा असून पत्रकारिता म्हणजे त्या आरशातील पारा होय. यामुळे या आरश्यात समाजाचा खरा चेहरा दाखविण्याचे काम पत्रकार करत आहे. असे मत नगराध्यक्ष रविंद्र पवार यांनी यावेळी व्यक्त केले. तसेच नगरसेवक गोपाल तिरमारे यांनी मराठी पत्रकारितेचे जनक बालशात्री जांभेकर यांनी दर्पण हे पहिले मराठी भाषिक वृत्तपत्र सुरू केले होते. त्यामुळे दरवर्षी ६ जानेवारी हा दिवस दर्पण दिन म्हणून साजरा केला जातो. तसेच यावेळी चांदूर बाजार पत्रकाराच्या उत्कृष्ठ कामगिरी बद्दल अनेक उदाहरणे देऊन मराठी पत्रकार दिनाचे महत्व पटवून दिले.

यासोबतच पत्रकारांच्या उत्कृष्ट कार्याची दखल घेऊन तालुक्यातील सर्व पत्रकारांचा सत्कार नगराध्यक्ष रविंद्र पवार व नगरसेवकानी सत्कार करून नगर परिषद कार्यालयात दर्पण दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रर्माच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष रविंद्र पवार हे होते. तर मुख्य अतिथी म्हणून मधुसूदन कुलथे होते. तसेच प्रमुख अतिथी म्हणून पत्रकार मदन भाटे, ज्ञानेश्वर बोराळकर, , नगरसेवक गोपाल तिरमारे, अतुल रघुवंशी, नितीन कोरडे, सचिन खुळे, विजय विल्हेकर यांची उपस्थिती होती.
यावेळी पत्रकार राजाभाऊ देशमुख, मदन भाटे, भास्कर हिरडे, विलास पंचभाई, सुमित हरकुट, शरद केदार, पवन बैस, किशोर मेटे, माजीद इकबाल, बादल डकरे, शशिकांत निचत, वैभव उमक, केशव राऊत, रविंद्र औतकर, दिलीपशिंह ठाकूर, कासीम मिरझा आदी पत्रकारांचा भेट व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.