*शंकर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची जिल्ह्यात भरारी*

0
442
Google search engine
Google search engine

*शंकर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची जिल्ह्यात भरारी*
तळवेल प्रतिनिधी– तळवेल येथील शंकर विद्यालयाच्या विद्यार्थिनीनी गांधी विचार संस्कार परीक्षेत जिल्हास्तरावर सुवर्णपदक व रौप्यपदक प्राप्त करुन विद्यालयाच्या क्षीरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.जळगाव येथील गांधी रिसर्च फाउंडेशन या प्रसिद्ध संस्थेद्वारे आयोजित राज्यस्तरीय गांधी विचार संस्कार परिक्षेत शंकर विद्यालयाच्या विद्यार्थिनी कु.आचल उमेशराव काकडे हिने सुवर्णपदक व कु.रोशनी राजेंद्रराव गाडगे हिने रौप्यपदक मिळवले आहे.यावेळी केशरबाई लाहोटी येथे झालेल्या जिल्हास्तरीय बक्षीस वितरण समारंभात महाविद्यालय चे प्राचार्य डॉ भांगडीया,गांधी फाउंडेशन चे डॉ बोबडे, डॉ ढोपटे मेडम यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले.याबद्दल या विद्यार्थिनींचे श्री बाबाराव सार्वजनिक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष राजाभाऊ देशमुख शाळेचे मुख्याध्यापक दे.भी ठाकरे परिक्षा समन्वयक डॉ तुषार देशमुख व सर्व शिक्षक व पालकव्रुन्द यांनी अभिनंदन केले आहे.