राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनात कृषी विज्ञान केंद्र सिंदेवाहीला प्रथम पारितोषिक

0
468
Google search engine
Google search engine

सिंदेवाही : डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या १२१ व्या जयंती दिनानिमित्त राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत विस्तार शिक्षण संचालनालय, डॉ. पंदेकृवि, अकोला येथे कृषी विभाग, महाराष्ट्र शासन, प्रकल्प संचालक आत्मा, जिल्हा परिषद व संलग्न संस्था यांच्या सहकार्याने २७ ते २९ डिसेंबर यादरम्यान ‘ॲग्रोटेक २०१९’ राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनात सिंदेवाही येथील कृषी विज्ञान केंद्राने प्रथम पारितोषिक पटकाविले.

या प्रदर्शनामध्ये कृषी व कृषीसंलग्न असे एकूण ३०० च्या जवळपास दालन लावण्यात आली होते. डॉ. पंदेकृवि, अकोला अंतर्गत येणाऱ्या सर्व कृषी विज्ञान केंद्रांनी सहभाग नोंदवून आपल्या जिल्ह्यातील राबविण्यात येणारे तंत्रज्ञान उत्कृष्ट पद्धतीने लावण्यात आले होते. यामध्ये कृषी विज्ञान केंद्र सिंदेवाहीतर्फे लावण्यात आलेल्या दालनामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील एकात्मिक पीक पद्धती, धान लागवडीच्या विविध पद्धती, शिंगाडा लागवड तंत्रज्ञान, टसार रेशीम संगोपन, ॲझोला, हरितगृहातील भाजीपाला लागवड, माती परीक्षण, मुक्तसंचार गोठ्यातील पशुसंवर्धन आणि रानभाज्या आदी थेट प्रतिकृती प्रदर्शनामध्ये लावण्यात आले होते. सदर दालनास मानव संसाधन विकास, संचार आणि माहिती तंत्रज्ञान केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी भेट दिली. तसेच मोठ्या संख्येने राज्यातील शेतकरी, विद्यार्थी आणि मान्यवरांनी भेट दिली. या प्रदर्शनामध्ये कृषी विज्ञान केंद्र सिंदेवाहीतर्फे लावलेल्या दालनास प्रथम पारितोषीक आणि जिल्ह्यात कृषीसंवादिनीचा प्रचार व प्रसाराकरिता तिसरे पारितोषीक देऊन गौरव करण्यात आला.

सदर पारितोषीक माजी राज्यमंत्री वसुधाताई देशमुख, डॉ. पंदेविकृ अकोलाचे कुलगुरू डॉ. व्ही. एम. भाले, विस्तार शिक्षण संचालक डॉ. डी. एम. मानकर, अधिष्ठाता डॉ. व्ही. जी. इंगोले आणि संशोधन संचालक डॉ. व्ही. के. खर्चे यांच्या हस्ते देण्यात आले. याकरिता कार्यक्रम समन्वयक डॉ.व्ही. जी. नागदेवते, डॉ. व्ही.एन. सिडाम, डॉ. सोनाली लोखंडे, प्रा. प्रवीण देशपांडे आणि स्नेहा वेलादी यांनी सहकार्य केले.