बुलढाणा जिल्हा परिषदेवर महाविकास आघाडीने फडकविला आपला झेंडा

0
476

शेगाव :-
बुलढाणा जिल्हा परिषदेवर महा विकास आघाडीने आपला झेंडा फडकवल्यानंतर नवनिर्वाचित जिल्हा परिषद अध्यक्ष मनिषा ताई नितीन पवार या थेट संतनगरी शेगाव येथे श्री संत गजानन महाराज यांच्या चरणी नतमस्तक होण्याकरीता शेगाव मध्ये दाखल झाल्या यावेळी बोलताना बुलढाणा जिल्ह्यात सर्व घटकांना सोबत घेऊन विकास आचार्य महा विकास आघाडीच्या माध्यमातून पुढे नेण्याचे मनोगत व्यक्त त्यांनी केले .

बुलढाणा जिल्हा परिषदेवर महविकास आघाडी चा झेंडा

(बुलढाणा) जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवडणूक बिनविरोध झाली आहे. महाविकास आघाडीच्या काँग्रेसच्या मनिषा नितीन पवार या अध्यक्षपदी विराजमान झाले असून उपाध्यक्षपदी शिवसेनेच्या कमलताई जालिंदर बुधवत यांची निवड झाली आहे. प्रतिस्पर्धी भाजपकडून अध्यक्ष उपाध्यक्षपदासाठी दाखल करण्यात आलेले दोन्ही अर्ज मागे घेण्यात आल्यामुळे महाविकास आघाडीच्या अध्यक्ष उपाध्यक्षांची बिनविरोध निवड झाली आहे.बुलढाणा जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष पदासाठी महाविकास आघाडीकडून काँग्रेसतर्फे जानेफळ जिल्हा परिषद गटातील मनिषा पवार यांनी तर शिवसेनेतर्फे कमलताई जालिंदर बुधवत यांचे उमेदवारी अर्ज दाखल केले होते. भाजपतर्फे अध्यक्षपदासाठी जामोद जिल्हा परिषद गटातील रुपाली अशोक काळपांडे यांचा तर उपाध्यक्षपदासाठी जयश्री विनोद टिकार यांनी नामांकन अर्ज दाखल केले होते. दुपारी दोघांनीही अर्ज मागे घेतल्यामुळे निवडणूक बिनविरोध झाली.जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षाच्या निवडीसाठी बोलावण्यात आलेल्या विशेष सभेचे पिठासीन अध्यक्ष म्हणून बुलढाण्याचे उपविभागीय अधिकारी राजेश्वर हांडे यांनी काम पाहिले. पुरेसे संख्याबळ नसल्याने भाजप प्रारंभीच बॅकफुटवर गेलेली होती. महाविकास आघाडीतील काँग्रेसचे 14, शिवसेनेचे 11 तर राष्ट्रवादी काँग्रेसचे 9 सदस्य असून भारीप-बमसचाही पाठींबा महाविकास आघाडीला आहे.
आज रोजी मतृतिर्थ बुलढाणा जिल्ह्यात संपूर्ण महिला राज दिसत आहे
आगदी जिल्हाअधीकारी ,तहसिल दार ,पंचायत समिती अध्यक्षा पासुन
हे विशेष
शेे