दैनिक पुण्य नगरी चे तालुका प्रतिनिधी धनंजय आरबुने रिपोर्ट ऑफ द इयर पुरस्काराने सन्मानित परळी वैजनाथ:- दर्पण दिनाचे औचित्य साधून

154

परळी वैजनाथ:-नितीन ढाकणे

दर्पण दिनाचे औचित्य साधू उत्कृष्ट वार्तांकन करणाऱ्या पत्रकारास कराड हॉस्पिटल च्या वतीने रिपोर्ट ऑफ द इयर हा पुरस्कार देण्यात येतो. परळीतील राखेच्या प्रदूषणाविषयी वृत्त मालिकेच्या माध्यमातून दैनिक पुण्यनगरी ने या संदर्भात जनजागृती केली होती. तसेच या वृत्त मालिकेची दखल शासन दरबारी घेण्यात आली होती. यावर्षीच्या पुरस्काराचे मानकरी दैनिक पुण्यनगरीचे तालुका प्रतिनिधी धनंजय आरबुने हे ठरले आहेत. दि.6 जानेवारी 2020 रोजी त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या वेळी अंबाजोगाई पोलीस उपअधीक्षक राहुल धस, संभाजी नगर पोलीस ठाण्याचे पो. नि. बी.एन. पवार, परळीच्या नगराध्यक्षा सौ सरोजनीताई सोमनाथआप्पा हालगे, कराड हॉस्पिटलच्या संचालिका डॉ. शालिनीताई कराड, काँग्रेसचे नेते वसंत मुंडे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख व्यंकटेश शिंदे,वंदेमातरम सेनेचे दिलीपभाऊ जोशी, संपादक संघाचे उपाध्यक्ष राजेश साबणे, कार्याध्यक्ष आत्मलिंग शेटे, संपादक बालासाहेब फड, पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष बालकीशन सोनी, शहराध्यक्ष महादेव शिंदे, व मान्यवर दिसत आहेत.