रोटावेटर चोरटे चांदूर रेल्वे पोलीसांच्या जाळ्यात >< ठाणेदार श्री संतोष भंडारे यांच्या नेतृत्वात पोलीसांची कारवाई

158
जाहिरात
चांदूर रेल्वे –
चांदूर रेल्वे तालुक्यातील राजना येथुन रोटावेटर चोरणाऱ्या ४ आरोपींना चांदूर रेल्वे पोलीसांनी बेड्या ठोकल्या असुन ही कारवाई ठाणेदार संतोष भंडारे यांच्या नेतृत्वात करण्यात आली आहे.
७ डिसेंबरला तालुक्यातील राजना येथील फिर्यादी योगेश्वर दामोदरराव गावंडे यांच्या मालकीचे रोटावेटर अंदाजे किंमत ८० हजार रूपये राजना येथून चोरीला गेले होते. फिर्यादीच्या तक्रारीवरून चांदूर रेल्वे पोलीसांनी कलम ३७९, ३४ अन्वये अज्ञात आरोपीविरूध्द गुन्हा दाखल केला होता. यानंतर पोलीसांनी तपास चक्रे वेगात फिरवली असता आरोपी अंकित उर्फ साहिल संजय गौरखेडे वय १९ वर्ष रा. राजुरा, शुभम उर्फ सुभाष धनराज काकडे वय २३ वर्ष रा. एकपाळा, नारायण रवींद्र काळमेघ वय २३ वर्ष रा. एकपाळा, अंकित राजेंद्र निंबर्ते वय २४ वर्ष रा. राजुरा या चार आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केले असता त्यांना जामीन मिळाला आहे. तसेच आरोपींपैकी शुभम उर्फ सुभाष धनराज काकडे याने सूर्योदय कॉलनी, चांदूर रेल्वे येथून प्रमोद अर्जापुरे यांच्या मालकीची ट्रॅक्टर ट्रॉली सुद्धा चोरून नेल्याची कबुली दिली. या ट्रॅक्टर चोरी संबंधात सुरूवातीलाच कलम ३७९ अन्वये चांदूर रेल्वे पोलीस स्टेशनला गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. ही कारवाई ठाणेदार संतोष भंडारे यांच्या नेतृत्वात चांदूर रेल्वे पोलीसांनी केली आहे.