संत गजानन महाराजांच्या मुळ पादुका असणाऱ्या मुंडगांवात आज यात्रा महोत्सव

0
655
Google search engine
Google search engine

आकोटः संतोष विणके

श्री गजानन महाराजांच्या उपस्थितीत सन १९०८ ला पौष पोर्निमेच्या तिथी वर मुंडगावला असणाऱ्या यात्रेची प्रथा आजही सुरु आहे. यात्रे निमित्त सकाळी पहाटे श्रींचा मूर्ती अभिषेक. सकाळी ९ ते ११ वा ह भ प श्री गजानन महाराज हिरुळकर यांचे काल्याचे किर्तन राहील व मंदीराला मदत करनारे भक्त यांचा सत्कार होईल. दुपारी १२ ते ५ वा. पर्यंत भजनी दिंडीसह पालखीची नगर मिरवनुक राहील. सकाळी ११ ते संध्या. ५ पर्यंत महाप्रसाद राहील. संध्या ५ वाजता दहिहांडी उत्सव होनार आहे. व नंतर भजनी दिंडी प्रमुखांचा सत्कार राहील.
या यात्रा महोत्सवात ह भ प श्री विशाल महाराज खोले यांचे श्रीमद् भागवत कथा होती तर सात दिवस हरी किर्तन व महाप्रसाद चे आयोजन होते. यासाठी संस्थानचे २००० सेवाधारी उत्सव समिति, भांडार गृह समिति, सल्लागार समिति, व गावकरी श्रम घेत आहे.
तरी भक्तांनी यात्रेला उपस्थित राहुन मुळ पादुका दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन विश्वस्त मंडळाकडुन करन्यात आले.