संत गजानन महाराजांच्या मुळ पादुका असणाऱ्या मुंडगाव यात्रा महोत्सवाची सांगता

193

आकोटःसंतोष विणके

श्री गजानन महाराजांच्या पवित्र चरण पादुकांचा वारसा असलेल्या पादुका संस्थान मुंडगावच्या यात्रा महोत्सवाची काल दि.१० जाने. सांगता झाली.
श्री गजानन महाराजांनी ११२ वर्षा पूर्वी सन १९०८ ला पौष पोर्निमेला मुंडगावला यात्रेची प्रथा सुरु केली. आजही गावकरींनी ती भक्तांच्या मदतीने सुरु ठेवली . सकाळी ९ ते ११ वा. ह भ प श्री गजानन महाराज हिरुळकर यांचे काल्याचे किर्तन झाले. त्या नंतर मंदीराला नेहमीच मदतीचे हात पुढे करनारे भक्तांचा सत्कार करन्यात आला .

यात अकोटचे मुन्नासेठ अग्रवाल, कैलाससेठ अग्रवाल, सचिनजी बेलोकार, तुळशीरामजी इस्तापे, विहीर संस्थान चे विश्वस्त रामदासजी गणोरकार, तेल्हारा येथील सुरेशजी दायमा, जितेंद्रजी चांडक,अमोल देवर, भाष्कर शिंदे, पांडुरंग साबळे पिंपळोद, मुंडगावच्या नवनिर्वाचीत जि. प. सदस्य सुश्मिताताई सरकटे, प. स. सदस्य ज्ञानेश्वरजी दहीभात, हिरुळकर महाराज व इतर मान्यवरांचा सत्कार केला. यावेळी संस्थानने भक्तांच्या सुविधेकरीता लोकसहभागातुन भक्त निवासाच्या रुमसाठी सौजन्य देणगी देन्याकरीता आवाहण केले. सत्कार समारंभाचे प्रस्ताविक विजय ढोरे यांनी केले. दुपारी १२ वा. पालखी व रथाचे पूजन करुन भजनी दिंडीसह पालखीची नगर मिरवनुक काढन्यात आली. यावेळी बाहेरगावच्या ४० दींड्या सहभागी झाल्या. सकाळी ११ ते संध्या. ७ पर्यंत हजारो भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. संध्या ५ वाजता दहिहांडी उत्सव ऊत्साहात पार पडला . व नंतर भजनी दिंडी प्रमुखांचा व टाळकरी, गायनाचार्य, मृदुंगाचार्य, विनेकरी, चोपदार यांचे सत्कार करन्यात आले


या यात्रा महोत्सवात संस्थानचे २००० सेवाधारी उत्सव समिति, भांडार गृह समिति,वार्ताहर सल्लागार समिति, युवक मंडळ व गावकरी यांनी परीश्रम घेवुन महोत्सव यशस्वी केला.
यामध्ये डॉ सुभाष रोठे, अशोक बेलसरे, ठाकरे गुरुजी, भाल काळे, विनोद घाटोळ, सुरेश फुसे, विजय गावंडे, जयसिंग आसोले भरत आसोले, दीपक सापधारे, शेटे परिवार, व प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सर्वांनी मदत केली. अध्यक्ष ज्वारसींग आसोले विश्वस्त शरद सोनटक्के, महेश गाढे, विलास बहादुरेंची, विजय ढोरे, डॉ प्रवीण काळे, गणेश ढोले व सल्लागार समितिने सर्वांचे आभार मानले.