अकोल्यात रस्ता सुरक्षा सप्ताहाचे थाटात उदघाटन,

0
855
Google search engine
Google search engine

वाहतुक शाखा राबवणार सप्ताहभर विविध उपक्रम

अकोलाःप्रतिनीधी
सामान्य लोकां मध्ये वाहतूक व रास्ता सुरक्षे विषयी जनजागृती व्हावी व त्या माध्यमातुन अपघातांच्या प्रमाणात घट होऊन जीवित व वित्तहानी होऊ नये म्हणून दरवर्षी रास्ता सुरक्षा सप्ताह साजरा करण्यात येतो, ह्या वर्षी सदर सप्ताह 11 जानेवारी ते 17 जानेवारी पर्यंत साजरा करण्यात येणार आहे, त्या अनुषणगाने अकोला पोलीस अधीक्षक अमोघ गावकर ह्यांचे निर्देशा नुसार शहर वाहतूक शाखे चे पोलीस निरीक्षक गजानन शेळके ह्यांनी रास्ता सुरक्षा सप्ताहाची सुरवात विद्यार्थी व पालक ह्यांची रॅली ला हिरवा झेंडा दाखवून केली ,

सदर रॅली मध्ये पोदार जम्बो किडस स्कुल चे विद्यार्थी, पालक व शिक्षक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते, सर्व प्रथम पोलीस निरीक्षक गजानन शेळके ह्यांनी रास्ता सुरक्षेचे महत्व विशद करून भारतात दरवर्षी दीड लाखाचे वर लोक रास्ते अपघातात मरण पावतात, प्रत्येक तासात भारतात अपघातात 17 लोक आपला जीव गमावतात, स्वातंत्र्य उत्तर भारतात आज पावेतो युद्ध, रोगराई, नैसर्गिक आपत्ती ह्या मध्ये जेवढी जीवित हानी झाली नाही त्या पेक्षा कितीतरी जास्त जीवित हानी रास्ते अपघातातून झाली आहे

, त्या मुळे अपघात होऊ नये म्हणून प्रत्येक नागरिकाने सावधगिरी बाळगून वाहतुकीचे नियम पाळणे आवश्यक आहे, ह्या बाबत नागरिकां मध्ये जनजागृती व्हावी म्हणून रास्ता सुरक्षा सप्ताह साजरा करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले, त्या नंतर प्रमुख मार्गावरून विद्यार्थी, पालक, व शिक्षक ह्यांची रॅली काढण्यात आली

रॕली मध्ये विद्यार्थी व पालकांच्या हाता मध्ये अपघात टाळण्यासाठी आवश्यक बाबी अधोरेखित करणारे घोषवाक्ये लिहलेली बॅनर्स व फलक होते, समोर पोदार जम्बो किडस स्कुल चे बँड पथक होते, सदर रॅली यशस्वी होण्यासाठी पोदार जम्बो किडस च्या प्रिन्सिपॉल श्रीमती नीता तलरेजा, मुख्याध्यापिका श्रीमती संगीता धनुका, प्रशासकीय अधिकारी चेतन सोने, स्पोर्ट प्रभारी ब्रिजेश नायर, शहर वाहतूक शाखेचे अधिकारी व कर्मचारी ह्यांनी सहकार्य केले, सप्ताहाभर शहर वाहतूक शाखे तर्फे विविध प्रबोधनात्मक कार्यक्रम व धडक मोहीम राबविण्यात येणार असल्याचे पोलीस निरीक्षक गजानन शेळके ह्यांनी सांगितले