उस्मानाबादेत पत्रकाराला पोलिसांकडून धक्काबुक्की ? साहित्य संमेलनाच्या वार्तांकनावेळी अरेरावी केल्याची माहिती

384
जाहिरात

उस्मानाबाद – अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात झी २४ तास रिपोर्टर  मुस्तान मिर्झा यांना पोलिसांनी धक्काबुक्की केल्याने राज्यातील अनेक पत्रकारांनी  निषेध व्यक्त केला असून, मुजोरी करणाऱ्या पोलिसांना तात्काळ निलंबित करण्याची मागणी केली आहे.

उस्मानाबाद येथे सुरू असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात संत साहित्यावरील परिसंवादा दरम्यान वाद झाला.  एका वक्त्याने संत साहित्यामुळे बुवाबाजी होते, असे मत व्यक्त करताच लातूर येथील पत्रकार  जगन्नाथ पाटील यांनी त्यास आक्षेप घेवून  आपले म्हणणे मांडण्यास संधी द्यावी, म्हणून व्यासपीठावर  गोंधळ घातला. यावेळी संयोजक त्यास धक्का बुक्की करून बाहेर काढत होते, यावेळी त्याची झी २४ तास रिपोर्टर  मुस्तान मिर्झा शूटिंग करीत असताना, पोलीस उप निरीक्षक दिनेश जाधव आणि पोलीस हेड कॉन्स्टेबल शिवा गवळी यांनी धक्काबुक्की करून सभागृहाच्या बाहेर हाकलून लावले. यावेळी संयोजक असलेले दोन पत्रकार मूग गिळून गप्प होते, हे विशेष.

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।