वाघाची पहिली शिकार,या परिसरातील नागरिकांना सावध राहण्याचा इशारा

3056

चांदूरबाजार तालुक्यात वाघाची एन्ट्री;वाघ वयोवृद्ध असल्याची प्रथमदर्शनी कडून माहिती

शिरसगाव अर्डक व बेलोरा राजुरा परिसरात वाघाच्या पाऊलखुणा,मोर्शी वनपरिक्षेत्र मध्ये असल्याची प्राथमिक माहिती

चांदूर बाजार -:

तालुक्यातील शिरजगाव अर्डक़ व बेलोरा राजुरा परिसरात वाघाचे दर्शन झाल्याच्या चर्चेने तालुक्यात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सदर भागात वाघाच्या पाऊल खुणा आढळल्याने वनविभागाने सुद्धा याला दुजोरा दिला आहे.
तालुक्यात काल रात्री च्या ९.३० दरम्यान शिरजगाव अर्डक गावातील रहिवासी गजानन वानखडे घरी जात असताना रस्त्यावर वाघाचे दर्शन झाले. याची सूचना त्यांनी गावकऱ्यांना दिली. त्यानंतर याची माहिती वन विभागाला देण्यात आली. माहिती मिळतात वन विभागाचे चमु गावांमध्ये दाखल झाली आहे. तसेच या भागात वाघाची शोध मोहीम सुरु केली आहे. मात्र रात्री वेळ झाल्याने वणाधिकारिणी पुन्हा सकाळी घटनास्थळी जाऊन परिसरातील पाहणी केली. यावेळी त्यांना वाघाचे पागमार्क आढळून आले.
तालुक्यातील राजुरा शिवारात हाच वाघ वनरक्षक पि. के. वाटाणे यांना दिनांक 10 जानेवारी ला सकाळी 9वाजून 55 मिनिटांनी दिसून आला. यावेळी चांदुर बाजार येथील शिक्षक राजेश लेंडे आणि मंगेश वाघमारे याना सुद्धा प्रत्यक्ष वाघ दिसले असल्याची त्यांनी सांगितले.त्याचेही पगमार्क घेतले असता सोळा बाय सोळा चे असल्यामुळे हाच तो वाघ असावा असे वनविभागाने आपला प्राथमिक अंदाज व्यक्त केला.
काल रात्री चांदुर बाजार तालुक्यातील शिरसगाव अर्डक परिसरात वाघ दिसून आला. मात्र आज सकाळी तो राजुरा परिसरात आढळल्याने तो वाघ मोर्शी वनपरिक्षेत्रात दाभेरी जंगलात गेला असल्याचे अंदाज व्यक्त होत आहे. वाघाचे दर्शन झाल्यामुळे शिरजगाव अर्डक, जवळा, तळवेल, खरवाडी, बेलोरा , राजुरा या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच गावकऱ्यांनी सतर्क राहण्याकरिता अनेक ग्रामपंचायतींनी मुनादी सुद्धा दिली आहे.
यामुळे परिसरातील नागरिकांनी दोन-तीन दिवस सावधगिरी म्हणून रात्रीला शेतात जाण्याचे टाळावे. शेतातून लवकर घरी यावे. तसेच आपल्या पाळीव जनावरांना सुरक्षित ठिकाणी ठेवावे. असे आव्हान वन विभाग तर्फे करण्यात आलेले आहे .

प्रतिक्रिया:-
( नागरिकांतर्फे मिळालेल्या माहितीनुसार घटनास्थळी काल दिनांक 10 जानेवारीला जाऊन तपासणी केली असता ते पागमार्क वाघाचे असल्याचे आढळून आले आहे सध्या मोर्शी या भागातील दापेरी भागात गेले असल्याची प्राथमिक माहिती आहे.. – 1)प्रदीप.भड वन परिक्षेत्र अधिकारी परतवाडा)

काल सकाळी 7.30 ते 8 च्या दरम्यान बेलोरा ते राजुरा रोडवर सदर वाघ हा क्रॉस झाला असल्याची माहिती मिळाली आहे.सध्या त्याचे लोकेशन अध्यवत नाही.
2)आनंद सुरताने वनपरिक्षेत्र अधिकारी मोर्शी.

शंका बॉक्समध्ये

जवळपास वाघ हा 4 दिवसापासून मोर्शी आणि चांदुर बाजार तालुक्यात असल्याचे समजते असले तरी अध्यपही वाघाने कोणती शिकार केली नसल्याची माहिती आहे.मागील वर्षी देखील याच कालावधी मध्ये वाघ आला असल्याची चर्चा चांदुर बाजार तालुक्यात सुरू होती.मात्र आता सध्या त्याचे लोकेशन कोणालाच माहिती नसल्याचे समजते.

दरम्यान वाघाने एक काळवीट ची शिकार केले असल्याचे समजते असून तो सध्या विषनारो या भागात असल्याचे समजते चार दिवसांपासून वाघाने केली पहिल्या शिकारीत काळवीट हा सापडला असून वनविभागाने याबाबत परिसरातील नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचा इशारा दिला आहे.