डांगरखेड सेवा समितीचे विद्यार्थ्यांना ब्लँकेट वाटप

0
731
Google search engine
Google search engine

 

आकोटःसंतोषविणके

वॉटर कप स्पर्धेत जल बचतीसाठी सातपुड्याच्या डोंगर पायथ्याशी असणाऱ्या दुर्गम डांगरखेड येथे श्रमदान करणाऱ्या डांगरखेड सेवा समितीच्या सदस्यांद्वारा विद्यार्थ्यांना ब्लॅंकेट वाटप करण्यात आले शहरातील बस स्थानक मार्गावरील न. प. मराठी शाळा क्र. ७ मध्ये पाणी चळवळीतील सामाजिक कार्यकर्ते प्रशांत हिवराळे, संदीप बोबडे, देवानंद बुधवंत यांच्यातर्फे शाळेतील होतकरू, गरजू व बेघर विद्यार्थ्यांना थंडीपासून बचाव करण्यासाठी जीवनावश्यक साहित्य व ब्लँकेटचे वाटप करण्यात आले.

 

यावेळी उपस्थितांनी जलसंकटावर मात करण्यासाठीच्या उपाययोजना व डांगरखेड येथील पाणी फाउंडेशन तर्फे केलेल्या श्रमदानाचा परिसराला झालेल्या फायद्या बद्दल माहिती दिली. या कार्यक्रमासाठी नगर परिषदेच्या शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी अनुपम शर्मा हे मुख्य अतिथी म्हणून लाभले होते. मुख्याध्यापक सुधाकर पिंजरकर हे कार्यक्रमाचे अध्यक्ष होते व शिक्षक राजेश हंबर्डे, चंद्रकांत घुगे, नरेंद्रकुमार राठोर, भूषण नाथे, शिक्षिका मंगला वाघमारे शेंडे, तृष्णा तिवारी यांची यावेळी उपस्थित होती.