आमदार देवेंद्र भुयार यांच्या प्रयत्नामुळे मोर्शी नगर परिषदेतील घरकुलाचा प्रश्न सुटला –  प्राप्त झाले ७ कोटी ७० लक्ष रुपये !

1393

रुपेश वाळके विशेष प्रतिनिधी /

गरिबांना हक्काचे छप्पर लाभावे या दृष्टिकोनातून घरकुले बांधण्यासाठी लाभार्थ्यांना अनुदान दिले जात असल्याचे सरकार दरबारी सांगण्यात येत असून तरी प्रत्यक्षात घरकुलाच्या लाभार्थ्यांची पदोपदी अडवणूक होत असून घरकुलाच्या जागेपासून ते मिळणाऱ्या निधीपर्यंत असंख्य अडथळे लाभार्थ्यांना पार करावे लागत आहेत त्यांना न्याय मिळावा यासाठी मोर्शी विधानसभा मतदार संघाचे नव निर्वाचित आमदार देवेंद्र भुयार यांनी निदेशक आवासन और शहरी कार्य मंत्रालय नई दिल्ली यांना निवेदन देऊन तात्काळ समस्या सोडविण्याची व निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती आमदार देवेंद्र भुयार यांच्या प्रयत्नांना यश आले असून आमदार देवेंद्र भुयार यांच्या प्रयत्नाने मोर्शी नगर परिषदेला ७ कोटी ७० लाख ४० हजार रुपये प्राप्त झाले असल्यामुळे मोर्शी नगर परिषदेतील लाभार्थ्यांचा घरकुलाच्या निधीचा प्रश्न सुटला .

मोर्शी नगर परिषद क्षेत्रातील शासनाच्या प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत ९६३ घरकुलांना अमंजुरी मिळाली होती त्यापैकी ५३५ घारकुलांचे कामे सुरू होऊन त्यांना राज्य शासनाचा पहिला हप्ता ४० हजार प्रत्येकी वाटप करण्यात आले त्यापैकी घारकुलांचे कामाची प्रगती पाहून ४२० लाभार्थ्यांना दुसरा हप्ता ४० हजार रुपये व ३७० लाभार्थ्यांना तिसरा हप्ता २० हजार रुपये वाटप करण्यात आले होते परंतु गेल्या वर्षभऱ्याच्या काळात केंद्र शासनाचा निधी अद्याप पर्यंत नगर परिषदेला मिळाला नव्हता त्यामुळे घरकुल लाभार्थ्यांचे घरे अर्धवट बांधून पडली असून लाभार्थी आर्थिक अडचणीत आले होते नागरिकांची अडचण लक्षात घेऊन आमदार देवेंद्र भुयार यांच्याकडे काँग्रेस , राष्ट्रवादी , शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी निधीची मागणी केली होती त्यानुसार देवेंद्र भुयार यांनी दिल्लीत जाऊन संबंधित अधिकाऱ्यांना भेटून हा विषय रेटून धरला त्यामुळे ८ जानेवारी रोजी मुंबई मंत्रालयात आमदार देवेंद्र भुयार , नगराध्यक्षा मेघना मडघे , मोहन मडघे , नगरसेवक प्रीती देशमुख , दीक्षा गवई , यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन केंद्र शासनाच्या ५ कोटी ७७ लक्ष ८० हजार व राज्य शासनाचा उर्वरित २० टक्के हप्त्याचे १ कोटी ९२ लक्ष ६० हजार रुपये निधीचे आदेश मंजूर करून घेतले व १० जानेवारीला नगर परिषदेला आदेश प्राप्त झाले . घरकुल मभार्थ्यांना यामुळे दिलासा मिळाला असून अपूर्ण राहिलेले घारकुलांचे काम पूर्ण करण्यास त्यांना निधी उपलब्ध झाला आहे त्याबडफल घरकुल लाभार्थ्यांनी आमदार देवेंद्र भुयार , नव निर्वाचित नगराध्यक्षा सौ मेघना मडघे , यांचे आभार व्यक्त करीत आहे .

३७३ घरकुल लाभार्थ्यांना  पंतप्रधान आवास योजना अंतर्गत फक्त तीनच हप्ते प्राप्त झाले होते परंतु केंद्राचा निधी न मिळाल्यामुळे चौथा हप्ता   वितरित न झाल्यामुळे सर्व लाभार्थ्यांच्या घराचे बांधकाम अर्धवट राहिले होते त्यामुळे सर्वच लाभार्थ्यांना भाड्याच्या घरात राहावे लागत असल्यामुळे त्यांना घर भाड्याचा भर्दंड सहन करावा लागत असल्याचे आमदार देवेंद्र भुयार यांच्या निदर्शनास येताच त्यांनी . प्रधानमंत्री आवास योजनामधील घरकुलाचे काम तात्काळ  पूर्णत्वास आणण्याकरिता मोर्शी , नगर परिषद क्षेत्रातील लाभार्थ्यांना चौथा हप्ता तातडीने वाटप करण्याची मागणी केली होती अखेर आमदार देवेंद्र भुयार यांच्या प्रयत्नांना यश आले .
म्हाडा कार्यालय मुंबई येथे गेल्या ७महिण्यापासुन प्रलंबित असलेल्या प्रधानमंत्री आवास योजना(शहरी)करिता मोर्शी नगरपरिषद मंजुर डी.पी.आर ४९४ करिता _म्हाडा कार्यालय मुंबई_ यांचे कडुन चौथा हप्ता मंजुर केला असुन म्हाडा कार्यालय मुंबई येथे मोर्शी विधानसभा मतदार संघाचे आमदार मा .देवेन्द्रजी भुयार, , मोर्शी नगर परिषदेच्या नगराध्यक्षा सौ मेघना मडघे , मोहन मडघे , दिपीप गवई , यांच्यासह स्वाभिमानी शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस व इतर पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते .