स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूलची युवा दिन रॕली

0
893
Google search engine
Google search engine

मॉ जिजाऊ, सावित्रीबाई व स्वामी विवेकानंद जयंती साजरी.

अकोटः संतोष विणके 

स्थानिक स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज च्या वतीने राष्ट्रमाता मॉ जिजाऊ, क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद जयंती उत्साहात साजरा करण्यात आली. या संयुक्त जन्मोत्सव सोहळा निमित्त अकोट शहरातून भव्य रॅली आयोजन करण्यात आली होती.

रॅली मध्ये मॉ जिजाऊंच्या वेशभूषेत कु. दिया प्रशांत कुकडे, सावित्रीबाईंच्या वेशभूषेत कु. पायल राजेंद्र देशमुख, बालाशिवाजीच्या वेशभूषेत हर्षवर्धन सावरकर, भारतमातेच्या वेशभूषेत कु. अर्पिता शर्मा व स्वामीजींच्या वेशभूषेत वल्लभ चोरे हे विद्यार्थी समाविष्ट होते.

महारॅली मधून विद्यार्थ्यांनी स्वच्छता अभियान, बेटी बचाव बेटी पढाओ तंबाखू मुक्त व्यसन मुक्त, वृक्ष संवर्धन अभियानाचे फलक विद्यार्थ्यांनी प्रदर्शित केले.तसेच रस्ता सुरक्षा संदेश व मोबाईलचे दुष्परीणाम हे रोड शोच्या कार्यक्रमातुन दाखवले.या ओजस्वी संदेश रॅली अभियानातून आकोटवासी युवकांना संदेश देण्यात आला

यावेळी पालक प्रतिनिधी जितेंद्र राऊत व प्रवीण दोड तसेच संस्थेचे अध्यक्ष दिलीप अग्रवाल , उपाध्यक्ष पुरुषोत्तम मुरकुटे उपाध्यक्ष दिलीप चावडा सचिव मोबिन शेख, कोषाध्यक्ष मेहुल नगदीया प्राचार्य श्री सुनील वसु व मुख्याध्यापिका कामिनी चांडक व शिक्षक विद्यार्थ्यांनी स्वामिजींना माल्यार्पण करून विनम्र अभिवादन केले.