सुमधुर वाणीत मंगल पाठ संपन्न

215

आई शाकंभरी प्रगट दिन उत्सवात कुमार कार्तिक वर्मा व सोनल गणेश अवस्थी यांच्या सुमधुर वाणीत मंगल पाठ संपन्न
शेगाव :-
अन्न व भाजीपाल्या ची देवी म्हणून ख्याती असलेली आई शाकंबरी. आई चे पाग्टय महोत्सव संत नगरी शेगावातील बालाजी मंदिर मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले. यावेळी आई शाकंभरी च्या प्रतिमेला भाजीपाल्याने सजवून विराजमान करण्यात आले होते. या उत्सवामध्ये संत नगरीतील मंगलपाठ प्रवाह कुमार कार्तिक मनोज वर्मा व कुमारी सोनल गणेश अवस्थी यांनी आपल्या सुमधुर आवाजात आई शाकम्भरी ची संपूर्ण लीला विस्तृत स्वरूपात भक्तांसमोर मांडली. या प्रगट दिन महोत्सव शाकंभरी परीवार सहभागी झाला असून गजरा उत्सव ,मेहंदी उत्सव अशा विविध प्रकारचे आयोजन केले होते.