अमरावती :-
स्थानिक विभागीय संदर्भ सेवा
रुग्णालय ( सुपर स्पेशलिटी) हॉस्पिटल अमरावती. येथे ६६ वी किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया पूर्ण करण्यात आली.
सदर रुग्ण हा तीन वर्षांपासून किडनी आजाराने त्रस्त असल्याने त्यासाठी बाहेर उपचार पद्धती चालू होती व काही वर्षांपासून डायलिसिस करत होता . तेव्हा डॉक्टरांनी रुग्णास व त्याच्या कुटुंबीयास किडनी प्रत्यारोपण विषयी माहिती दिली व विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय ,अमरावती येथे महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून होत असलेल्या यशस्वी व विनामूल्य शस्त्रक्रिया यासाठी रुग्ण विविध जिल्ह्यांमधून नव्हे तर इतर राज्यामधून सुद्धा येत असतात याविषयी महिती दिली. तेव्हा आज रुग्णालयात झालेले ६६ वे किडनी प्रत्यारोपण, हे २७ वर्षीय मोहम्मद सज्जाद मोहम्मद इब्राहिम यांची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आली आहे. सदर रुग्ण हा मु. नायगाव ता .जि. अकोला येथील रहिवासी असुन मागील काही वर्षापासून डायलिसिस चालु होते मात्र डायलिसिस यावर दीर्घकाळ उपाय नसून व होणारा त्रास बघुन किडनी प्रत्यारोपण हा यावरील योग्य उपाय आहे, असे जेव्हा डॉक्टरांनी सांगितले त्यावेळी मुलाच्या पुढील भविष्याचा विचार करून आई. नाझपरवीन मोहम्मद इब्राहिम (४९ वर्ष )यांनी आपली एक किडनी मुलगा सज्जाद ला देण्याचा निर्णय घेतला, व आपली एक किडनी सज्जाद ला देऊन त्याला नवीन जीवन दिले.महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजने अंतर्गत शस्त्रक्रिया विनामुल्य करण्यात आली.सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल अमरावती येथील वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमोल नरोटे व विशेष कार्य अधिकारी डॉ. मंगेश मेंढे यांच्या मार्गदर्शनाखाली नेफरोलॉजिस्ट डॉ. प्रणित काकडे, डॉ. नयन काकडे ,युरो सर्जन डॉ.राहुल पोटोडे, डॉ.विक्रम देशमुख, डॉ. राहुल घुले, डॉ. प्रतिक चिरडे, डॉ विशाल बाहेकर,बधिरिकरण तज्ञ- डॉ. रोहित हातगावकर, डॉ. बाळकृष्ण बागवाले, डॉ. दिपाली देशमुख, डॉ अंजु दामोदर, डॉ. परिणिती ,डॉ.विक्रांत कुळमेथे, डॉ.माधव ढोपरे,डॉ. जयश्री पुसदेकर, डॉ.नाहीद, डॉ. रमणीय,डॉ. उज्वल अभ्यंकर, डॉ. प्रियंका कांबळे, डॉ. श्रद्धा जाधव,समाजसेवा अधीक्षक (वैद्यकीय) शितल बोंडे, ऋषिकेश धस, डॉ.सोनाली चौधरी,महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजने मधील एम.सी.ओ.डॉ. पायल रोकडे ,डॉ. दिव्यांनी मुंदाने, आशिष तायडे त्याचप्रमाणे अधीसेविका चंदा खोडके यांच्या सूचनेनुसार इन्चार्ज सिस्टर ज्योती तायडे, सरला राऊत, नीता कांडलकर, दिपाली तायवाडे, माधुरी सोनटक्के, , विवेक तायडे, वैष्णवी निकम, कीर्ती तायडे, लता मोहता, नीलिमा मलवार, अक्षय पवार, मयुरी खेरडे,नीलिमा, अनु वडे,योगिश्री पडोळे,वैशाली ढोबळे, विशाखा बरवान, अर्चना मढावी, वैष्णवी टाकरखेडे ,कोमल भालेकर, आर. गवई, दीक्षा बेलखेडे, आहारतज्ञ कविता देशमुख, रश्मिता दिघडे, श्रीधर ढेंगे, औषध विभागामधील योगेश वाडेकर, अमोल वाडेकर, प्रशांत शिरे , पंकज बेलुरकर,आशिष थुल, गजानन मातकर, शिवा भोंगाळे , आशिष मिश्रा, रुपेश हरडे,सुनीता ठाकूर, संगीता, दिपटे, भेंडकर, इंदू पाटील, गजानन चौधरी,प्रशांत थेटे, निलेश आत्राम इत्यादींचे किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रियेमध्ये विषेश सहकार्य होते.











