बाबू जगजीवनराम स्कुलमध्ये माँ. जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती उत्साहात.

0
585
Google search engine
Google search engine

 

आकोटः ता.प्रतिनीधी

बाबू जगजीवनराम स्कुलमध्ये माँ. जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी आपल्या अध्यक्षीय भाषणातून डॉ.कैलास जपसरे जिजाऊंच्या संस्कारामुळे छत्रपती शिवाजी महाराज एक आदर्श राजे झाले असे विचार मांडले. तसेच शिवचरित्राचे अभ्यासक श्री संतोष झामरे यांनी छत्रपती शिवरायांचे संपूर्ण जीवन चरित्र विद्यार्थ्यांच्या समोर मांडले. त्यानतंर प्रा. प्रवीण बोंद्रे यांनी स्वामी विवेकानंद यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकला.

याप्रसंगी युवा क्रीडा दिनी “खेलेगा इंडिया तभी तो आगे बढेगा इंडिया” यानिमित्त सतत तीन दिवस विद्यार्थ्यांच्या कबड्डी, खोखो, लंगडी, हॉलीबॉल, बुद्धिबळ, लिंबू चमचा अशा विविध स्पर्धा आयोजित केल्या होत्या. याप्रसंगी बाबू जगजीवन कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य यांनी आपल्या प्रास्ताविकातून संस्थेचा लेखाजोखा सादर करून स्वामी विवेकानंद यांचे जीवन चरित्राचा थोडक्यात परिचय करून दिला. या जिजाऊ महोत्सव प्रसंगी सुषमा रायबोले, निकिता उन्हाळे, दिशा सोळंके या विद्यार्थिनींनी आपले विचार मांडले.तसेच युवा महोत्सव प्रसंगी” अकोला पोलीस दल आणि सोल्जर फॉर वूमन अँड सेफ्टी विद्यार्थी सुरक्षा व सुरक्षात्मक उपाययोजना “या विषयावर अकोल्याच्या दमयंती पोलिस पथकाने स्वतःच्या सुरक्षेबाबत कशी काळजी घ्यावी याबद्दल पो.कॉ.गोपाल मुकुंदे, आणि विशाल मोरे यांनी उत्कृष्ट मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन प्रा.नंदकिशोर झामरे यांनी तर आभार प्रदर्शन श्री दिनेश इंगळे यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रा. प्रवीण उगले, प्रा. श्रीकांत मोहोकार, प्रा अक्षय काळे, गुलाम इम्रान, प्रा. दीपिका पिंप्राळे, , प्रा. प्रणाली शामस्कार, प्रवीण साबळे, प्रदीप शेळके, पवन काळे, सागर आहिर, विकी मंडले, ओव्हेकर, मनीषा सूर्यवंशी, गोकुला मोरोदे, शारदाताई यांनी अथक परिश्रम घेतले.