आकोटात रा.स्व.संघाच्या “युवा संगम”कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद

242
जाहिरात

नगरातील प्रमुख मार्गावरून सघोष पथसंचलन

आकोटःसंतोष विणके

भारत मातेला जगामध्ये उच्चतम अश्या पहिल्या स्थानावरती आरुढ झालेले बघण्याचे स्वप्न संघाने बघितले आहे.संघटित शक्तीच्या आधारावर धर्माचं संरक्षण करत हे ध्येय साध्य करता येईल. आम्ही एक आहोतहि भावना व्हावी.असे प्रतिपादन पंजाबजी आव्हाळे यांनी केले.ते श्री.सरस्वती विद्यालयाच्या प्रांगणावर आयोजित संघाच्या युवा संगम या कार्यक्रमात बोलत होते.


यावेळी व्यासपीठावर अँड मोहनराव आसरकर आकोला जिल्हा सहसंघचालक, ता. संघचालक सुधीरजी महाजन, प्रमुख अतिथी हभप पुरुषोत्तम नेमाडे, प्रमुख वक्ता पंजाबजी आव्हाळे आकोला विभाग कार्यवाह हे उपस्थिती होते.
प्रमुख अतिथ हभप पुरुषोत्तम महाराज नेमाडे यांनी राष्ट्र सुरक्षा व संघटन याविषयी आपले विचार व्यक्त केले


प्रमुख वक्ता पंजाबजी आव्हाळे हे पुढे बोलतांना म्हणाले की .विदर्भात १४१तालुक्यातील एकत्रिकरण करणारा संघ नवीन नाही. संघाचे काम विश्र्वव्यापी काम आहे. अनेक देशात संघाचे काम सुरू आहे. संघ ही जगात मोठी संघटना आहे. समाजाला प्रेरणा देणारी माणसं निर्माण करावयाची आहेत. संघाच्या माध्यमातून अनेक संस्था कार्यरत आहेत.आज १लाख ७५हजार सेवा प्रकल्प संघाचे स्वंयसेवक चालवीत आहेत.समाजात भ्रम निर्माण करणारे विरोधक आहे..अन राष्ट्र विरोधी शक्ती चांगल्या कामाला विरोध करतात. खऱ्याच्या मागे समाज उभा राहीला पाहिजे. आम्ही एक आहोत हि भावना निर्माण व्हावी असे प्रतिपादन पंजाब आव्हाळे यांनी केले.


या उत्सवात स्वागत,प्रास्ताविक,वक्ता व अतिथींचा परिचय नगर कार्यवाह नितीन शेगोकार यांनी करुन दिला.उत्सवात मुख्य शिक्षक रोशन लावणेंनी जबाबदारी सांभाळली उत्सवात नगरवासींची मोठी उपस्थिती होती.

पथसंचलनाला नगरवासींचा प्रतिसाद

    अकोट नगरातून काढण्यात आलेल्या रा.स्व.संघाच्या शिस्तबध्द सघोष पथसंचलनाला नगरवासींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.नगरवासींनी मार्गावर सडा संमार्जन करुन विवीध रंगावलींनी पथसंचलनाचे स्वागत करत स्वयंसेवकांवर पुष्पवृष्टी केली.घोषदंडाने सुध्दा आकृष्ट केले.