English E-Teach उपक्रमांतर्गत अकोट तालुक्यातील उत्कृष्ट जि.प.शिक्षक सम्मानित

0
741
Google search engine
Google search engine

अकोटः संतोष विणके

अपेक्षा होमिओ सोसायटी तसेच Child Rights Alliance व The Bombay Community Public Trust यांच्या अंतर्गत English E-Teach च्या संयुक्त विद्यमाने दि. 12/1/2020 रोजी गुरुकुंज मोझरी अमरावती येथे “शिक्षक सम्मान” सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.या सोहळ्यामध्ये विदर्भातील इंग्लिश ई टिच या कार्यक्रमातून शिक्षण क्षेत्रामध्ये आमूलाग्र बदल घडवणाऱ्या व त्या साठी सतत प्रयत्नात असलेल्या 39 तालुक्यातील 100 शिक्षकांचा सम्मान करण्यात आला.

यात अकोट तालुक्यातील जि. प. शाळा बांबर्डा येथील चेतन राऊत व जि.प.शाळा अंबोडा येथील कु. रेखा गीते यांचा मा.नंदकुमार प्रधान सचिव राज शिष्टाचार महाराष्ट्र शासन यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला आहे. अकोट तालुक्यात अपेक्षा होमिओ सोसायटी मार्फत तालुका समन्वयक म्हणून श्री. मयूर रतनराव गुजर काम पाहत आहेत. कार्यक्रमाला जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य डॉ. आंबेकर सर व डॉ. राठोड सर व उद्घाटक डॉ. गवई सर उपस्थित होते. तालुक्यातील सर्व वर्गातून दोन्ही शिक्षक यांना शुभेच्छा मिळत आहे.