विवाह सोहळ्यातून सामाजिक अभिसरण झाले पाहीजे! – प्रकाश पोहरे

226
जाहिरात

————————-
मध्यस्थी परिचय पुस्तिकेचे प्रकाशन संपन्न
————————-
आकोट:संतोष विणके

विवाह सोहळ्यातील अनिष्ट बाबीं मनाला मनस्ताप देणा-या आहेत त्या टाळून विवाह पार पाडले पाहीजेत.विवाह एक पवित्र बंधन आहे.दोन कुटुंबच नव्हे तर संपुर्ण समाज एकत्र येत असतो.मुलांमुलींचे लग्न,सोयरिक,पीकपाणी,सुखदुःख या सा-या कौटुंबिक व सामाजिक विषयावर संवाद साधण्यासाठी विवाह सोहळे प्रभावी माध्यम आहे.त्यातून सामाजिक अभिसरण घडत असते असे उद्बोधक विचार शेतकरी नेते तथा दै.देशोन्नतीचे मुख्यसंपादक प्रकाश पोहरे यांनी मांडले.

श्री संत वासुदेव महाराज ज्ञानपीठ संस्थेद्वारा गठीत मध्यस्थी वधू-वर सुचक मंडळ आकोटच्या वधू-वर परिचयाच्या आठव्या वार्षिकांकाचे प्रकाशन प्रकाश पोहरे यांचे हस्ते पार पडले त्यावेळी ते बोलत होते.अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष ह.भ.प.वासुदेवराव महल्ले होते.या प्रसंगी सहकार नेते नानासाहेब हिंगणकर ,जि.प.चे माजी उपाध्यक्ष शिवाजीराव देशमुख,माजी उपाध्यक्ष तथा नवनिर्वाचित सदस्य गजानन पुंडकर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

प्रकाश पोहरे यांचे यावेळी ग्रामिण व कृषी अर्थव्यवस्थेच्या विदारक स्थितीवर प्रकाश टाकणारे उद् बोधक व्याख्यान झाले.शेती व्यवसाय हा परवडत नसेल तर तो सोडून नवे पर्याय शोधावे लागतील .उत्पादन नव्हे तर उत्पन्न वाढले पाहीजे.शेती मालावर प्रक्रिया उद्योग धंदे व सेंद्रिय शेतीशिवाय पर्याय नाही शेतीविषयक शासकीय धोरण हेच शेतक-याच्या मुळावर उठले आहे.त्यासाठी आक्रमक आंदोलनासाठी रस्त्यावर उतरण्याची वेळ आली आहे.त्यासाठी संघटीत व्हा.असे कळकळीचे आवाहन प्रकाश पोहरे यांनी केले.यावेळी नानासाहेब हिंगणकर ,शिवाजीराव देशमुख,गजानन पुंडकर संस्थेचे कोषाध्यक्ष पुरुषोत्तम लाजुरकर यांची भाषणे झालीत.

यावेळी गजानन पुंडकर,कॕप्टन सुनिल डोबाळे,कवीवर्मय निलेश म्हसाये ,ध्यस्थी पुस्तिकेचे मुद्रक धिरज हिंगणकर ,अमरावती विद्यापीठातून कला शाखेत एम ए इतिहास परिक्षेत मेरिट आल्याबद्दल कु.पल्लवी दिपक हिंगणकर ,कु.करिष्मा शालीग्राम कोरडे तथा मध्यस्थीचे कार्यालयीन व्यवस्थापक यांचा सत्कार पार पडला.नागोराव वानखडे यांनी यावेळी मध्यस्थी गीत सादर केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविकातून मध्यस्थी मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब फोकमारे यांनी मध्यस्थीच्या कार्याचा आढावा सादर केला तर संपादकीय मनोगत मुख्य संपादक नंदकिशोर हिंगणकर यांनी व्यक्त केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ रेखाताई संदिप बोबडे तर आभार प्रदर्शन मंडळाचे सचिव सुरेशदादा कराळे यांनी केले.

कार्यक्रमाला जि.प.चे माजी सदस्य बाळासाहेब बोंद्रे,सदाशीवराव पोटे,गजाननराव दुधाट ,अनिल कोरपे,बाळासाहेब आमले,डी.ओ.म्हैसणे,अमृतराव वाघ,समाधान उपाध्ये,ज्ञानदेवराव वनारे,विनायकराव कुकडे,महादेवराव सावरक,विलास चोरे,प्रा.साहेबराव मंगळे,नागोराव कुलट,मधुकर पुंडकर,वृंदाताई मंगळे,बंडू कुलट,सुधाकर हिंगणकर ,भाष्करराव डिक्कर,गजानन वालसिंगे,प्रकाश फुके,राममुर्ती वालसिंगे,गजानन महल्ले ,धनंजय वाघ,भाष्करराव देशमुख ,संदिप बोबडे,विठ्ठलराव मंगळे आदीसह पालक तथा समाज बांधव मोठ्या संख्येने हजर होते.