सिल्वर फाऊंडेशन अकोटची वार्षिक सभा उत्साहात

0
552

फाऊंडेशन राबविणार विविध समाजसेवा उपक्रम

अकोटः संतोष विणके

अकोट येथील सामाजिक संघटना सिल्वर फाऊंडेशन ची वार्षिक सभा अत्यंत उत्साहात व खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली,
सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकरराव पांडे होते तर प्रमुख अतिथी रविदादा मुंडगावकर , व प्रतिभा साहित्य संघाचे संस्थापक अध्यक्ष विठ्लराव कुलट,कुमार वर्मा,प्राचार्य अशोकराव घाटे यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या सुरवातीला राजमाता आई जिजाऊ व युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे प्रमुख अतिथी व मान्यवरांच्या हस्ते विधिवत पूजन करण्यात आले,
यानंतर विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या लोकांचा सत्कार करण्यात आला .
यामध्ये प्राचार्य अशोक घाटे ,विठ्ठलराव कुलट सर,संजय वालसींगे सर, रविदादा मुंडगावकर , अमर भागवत सर, कुंमार वर्मा, यांचा सत्कार करण्यात आला, ग्रामीण साहित्य संमेलन च्या संपादक पदी नियुक्ती झाल्याबद्दल राहुल कुलट यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला
आपल्या सत्काराला उत्तर देताना रविदादा मुंडगावकर यांनी नव्या सामाजिक उपक्रमांची माहिती देवून सिल्वर च्या कार्याचे कौतुक केले, तर विठ्ठलराव कुलट यांनी रूढी परंपरा ,अंधश्रद्धा दूर ठेवून संत गाडगेबाबा यांचा वसा पुढे सुरू ठेवण्यासाठी अविरत प्रयत्न करावेत असे मत आपल्या मनोगतातून व्यक्त केले. याप्रसंगी प्राचार्य अशोक घाटे,अमर भागवत यांनी सुद्धा आपले विचार व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थापक अध्यक्ष प्रभाकर पांडे यांनी तर विजय भोरे यांनी अहवाल व जमाखर्च वाचन केले, कार्यक्रमाचे संचालन उमेश देशमुख यांनी तर आभार प्रदर्शन प्रकाश गायकी यांनी केले
कार्यक्रमाला ,डॉ दिनेश नागमते, राठिजी,
मनोज वर्मा, कपिल घायल, राजकुमार सिकची,
विठ्ठल वाकोडे, सुनील गिरी, योगेश देशपांडे, अभिजीत चातारे ,हितेश महाजन, मंगेश पांडे, निलेश तळोकार,प्रमोद येऊल,महेश पुरोहित ,पंकज जोत
यांची उपस्थिती होती
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी
सिल्वर फाऊंडेशन चे मेहूल नगदीया ,रवींद्र कापसे ,चंद्रशेखर राऊत,निशिकांत भुरे,संजय तेलगोटे,
सेवक लधवानी, ढोले साहेब, अमोल बोंडे,
अनिल गोंडचवर, विजय छेदाणी ,प्रशांत पांडे, संजय पांडे,हरीश गांधी यांनी परिश्रम घेतले .