शेगांवतील नामवंत तज्ञ डॉक्टांच्या बांधकामात वापरण्यात येणार काल बाह्य झालेले ACC सिमेंट

0
1697
Google search engine
Google search engine

शेगावातील नामवंत तज्ञ डॉक्टरांच्या बांधकामात वापरण्यात येणारा ACC सिमेंट काल बाह्य…

शेगांव – संतनगरी शेगावात ख्याती प्राप्त हदयरोग तज्ञ डॉक्टर हरीश सराफ व व स्किन स्पेशालिस्ट डॉक्टर शैलेश गोयनका यांच्या सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलचे बांधकाम स्थानिक कालफाडी जिन व धानुका कंपाउंड मध्ये सुरू आहे या बांधकामासाठी दोन्ही डॉक्टरांनी संत नगरी शेगाव मधील ए सी सी सिमेंट अधिकृत विक्रेता संदीप अग्रवाल यांच्याही संपूर्ण बांधकामासाठी लागणारा सिमेंट घेण्याचा सौदा केला , यामध्ये सिमेंट हे कंपनीच्या गोडाऊन मधून डायरेक्ट बांधकामाच्या ठिकाणी येणार असे ठरले मात्र झालं वेगळंच. कंपनीच्या खामगावस्थीत गोडावूनमधून बांधकामासाठी पाठवण्यात आलेले संपूर्ण सिमेंट हे कालबाह्य होते.
संपूर्ण हॉस्पिटलच्या बिल्डिंगचा मुळगाभा (Plint leval) बांधण्यात याच सिमेंटचा वापर करण्यात आला, मात्र दुसरी खेप येताच ही कालबाह्य सिमेन्टची बाब डॉक्टरांच्य लक्षात आली तोपर्यंत वेळ निघून गेली होती. आत ए सि सि कंपनीच्या कालबाह्य झालेल्या सिमेंट पाठवल्या मुळे भविष्यात काही अनुचित प्रकार घडल्यास यावर सर्वस्वी जबाबदार कोण राहील हा एक प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे?
यासंदर्भात डॉक्टर सराफ यांनी सांगितले की उपरोक्त बाब ही चुकीची असून या गोष्टीसाठी आम्ही पोलिस तक्रार करुन कंपनीवर कारवाईची मागणी करणार तसेच

मुदत संपलेल्या सिमेंट बांधकामात वापरल्यास त्याची गुणवत्ता कमी होते अशी माहिती तेथे उपस्थित अभियंता क्षीरसागर यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली.

की कंपनीचे अधिकृत विक्रेता अग्रवाल यांनाही कंपनीने पूर्णतः अंधारात ठेवले ?
कंपनीकडून संतनगरीत आतापर्यंत झालेल्या अनेक बांधकामात व मागील १० वर्षा पासुन सुरु असलेल्या शासनाच्या विकास आराखड्यात खुप जागेवर ऐ सि सि सिमेंन्ट वापरले गेले असुन आता ही शंका सुध्दा निर्माण होत आहे ते सुध्दा काल बाह्य झालेले सीमेन्ट तर नसावे ही बाब सुद्धा विचारणीय आहे जर असे सिमेंट शेगावात पाठविण्यात आले असेल तर त्या बांधकामा मुळे जो काही ही धोका उत्पन्न होईल त्यास कोण जबाबदार राहील?
ग्राहकांची अशी मजबूत फसवनुक जर या नामवंत कंपण्या करत असतिल तर गरिबांचे राखन कसे होईल.
आता यावर की कार्यवाही होते हे पाहणे महत्वाचे ठरेल कारण…
डॉक्टर आणि कॉन्ट्रॅक्टर यामध्ये काही समजोता( settlement) तर झाले नसावे अशी चर्चा गावात रंगताना दिसत आहे.