पोलीस कर्मचाऱ्यांना लवकरच मिळणार हक्काची व तात्काळ वैद्यकीय सेवा-जि.पो. अधीक्षक अमोघ गावकर

0
738
Google search engine
Google search engine

 

रस्ता. सुरक्षा सप्ताह अंतर्गत नेत्र चिकित्सा शिबिर

, अकोलाःप्रतिनिधी

पोलीस व त्यांचे परिवारा करिता लवकरच पोलीस दवाखाना कार्यान्वित करण्यासाठी प्रयत्नरत असल्याचे प्रतिपादन अकोला जिल्हा पोलीस अधिक्षक अमोघ गावकर यांनी केले.ते रस्ता सुरक्षा सप्ताह अंतर्गत नेत्र चिकित्सा शिबिराचे उद्धाटन करतांना बोलत होते.सदर शिबिराचे उदघाटन कार्यक्रमात पोलीस अधीक्षक अमोघ गावकर, डॉ. शिरीष थोरात, डॉ. आशिष ठाकरे,गृह पोलिस अधीक्षक पाटील, पोलीस निरीक्षक गजानन शेळके, राखीव पोलिस निरीक्षक गुळसुंदरे उपस्थित होते,

अकोलाशहर वाहतूक शाखे तर्फे रस्ता सुरक्षा सप्ताह निमित्ताने विविध प्रबोधनात्मक कार्यक्रम व धडक मोहीम सुरू आहेत,रस्त्या वरील अपघात कमी करण्या साठी वेग वेगळे उपक्रम राबविण्यात येत आहे, त्याच अनुषंगाने नेत्र दोष असल्याने किंवा नजर कमी झाल्याने होणारे अपघात टाळता यावे म्हणून नेत्र चिकित्सा शिबिराचे आयोजन आज दि.16 जाने. रोजी पोलिस मुख्यालयातील मनोरंजन सभागृहात आयोजित करण्यात आले होते, सदर शिबीरा मध्ये अकोल्यातील प्रसिद्ध नेत्र रोग तज्ञ डॉक्टर शिरीष थोरात व त्यांचे चमू ने सेवा दिली, शिबिराचे उदघाटन पोलीस अधीक्षक अमोघ गावकर ह्यांनी करून सुरक्षित वाहन चालविण्या साठी शरीर सुद्धा स्वस्थ लागेल व ह्या साठी नेत्र चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आल्याचे सांगीतले.

पोलीस कर्मचाऱ्यांना कायम स्वरूपी हक्काची व तात्काळ वैद्यकीय सेवा मिळावी म्हणून लवकरच पोलीस हॉस्पिटल कार्यान्वित करणार असल्याचे त्यांनी सांगितले, डॉक्टर शिरीष थोरात ह्यांनी फक्त शिबिरा पुरतेच मर्यादित राहणार नसून आजच्या तपासणीत ज्यांना पुढील उपचार किंवा ओपेरेशन ची गरज आहे त्यांना कार्ड देण्यात येईल व वर्षभर त्यांचा उपचार त्यांचे स्वतः चे हॉस्पिटल मध्ये विनाशुल्क करण्यात येईल असे जाहीर केले, सदर नेत्र चिकित्सा शिबिरात पोलिस वाहन चालक, अकोल्यातील स्कुल बस चालक, वाहतूक कर्मचारी अश्या एकूण 225 लोकांची नेत्र तपासणी करण्यात आली.तसेच औषधे देण्यात आली व पुढील तपासणी व उपचारासाठी 92 रुग्णांना कार्ड देऊन डॉक्टर थोरात ह्यांचे नेत्र चिकित्सलया मध्ये त्यांना वर्षभर पुढील उपचार विनामुल्य करण्यात येणार आहे, सदर शिबीर यशस्वी करण्या साठी शहर वाहतूक पोलीस निरीक्षक गजानन शेळके डॉक्टर आशिष ठाकरे व वाहतूक कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले।