संत चोखामेळा जन्मस्थान विकासआराखडा पूर्ण करणार – पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे

0
634
Google search engine
Google search engine

संत चोखामेळा जन्मस्थान विकासआराखडा पूर्ण करणार
– पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे·
* संत चोखामेळा जन्मोत्सव यांचा752 वा उत्साहात साजरा
बुलडाणा, दि.14 : या महिन्यात राष्ट्रमाता जिजाऊ जयंती, संत चोखामेळा जन्मोत्सवसिंदखेड राजा विधानसभा मतदार संघात साजरे करण्यात येतात. त्यामुळे मतदारसंघात चैतन्यनिर्माण होते. संत चोखामेळा जन्मस्थळाचा विकास करण्यासाठी शासन कटीबद्ध आहे. येथीलविकासाकरीता 5 कोटी रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. त्यापैकी मागील काळात 50लक्ष रूपये मिळाले. उर्वरित निधी मिळवून हा विकास आराखडा पूर्ण करण्यात येईल, असेप्रतिपादन राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी आज केले. मेहुणाराजा. ता. दे.राजा येथे संत चोखा मेळा यांचा 752 वा जन्मोत्सव सोहळा जिल्हा परिषदेच्यावतीनेआयोजित करण्यात आला होता. त्यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. याप्रसंगीव्यासपीठावर माजी आमदार सर्वश्री डॉ. शशिकांत खेडेकर, हर्षवर्धन सपकाळ, जि.प उपाध्यक्षा कमलताई बुधवत, जि.प सभापतीदिनकर देशमुख, दे.राजा पंस सभापती हरीष शेटे, जि.प सदस्य सर्वश्री मनोज कायंदे,रियाजखॉ पठाण, शिला शिंपणे, प्र. मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश लोखंडे, उपविभागीयअधिकारी विवेक काळे, तहसिलदार सारीका भगत, मंगळवेढा येथील अप्पासाहेबपुजारी, शिवराज महाराज, रजनी शिंगणे, प्रा.कमलेश खिल्लारे, पं.स सदस्य रेणुका बुरकूल, माजी जि.प सदस्य बाबुराव नागरे, शिक्षणाधिकारीएजाज खान, सरपंच राधा भरत कांबळे आदींसह लोकप्रतिनिधी उपस्थित होते. संतचोखामेळा हे संत परंपरेतील मोठे नाव असल्याचे सांगत पालकमंत्री म्हणाले, संतचोखामेळा यांचे मेहुणा राजा हे गांव सर्व जाती – धर्माचे आहे. येथे सर्व जाती –धर्मातील नागरिक गुण्या गोविंदाने नांदतात. येथील केवळ भौतिक विकासच नाही, तर पर्यटनीयदृष्ट्याविकास झाला पाहिजे. या आराखड्यातील सर्व कामे दर्जेदार होण्यासाठी आपला प्रयत्नराहणार आहे. याप्रसंगी सभापती श्री. शेटे यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाच्या आयोजनामागिलभूमिका त्यांनी स्पष्ट केली. कार्यक्रमादरम्यान प्रा. कमलेश खिल्लारे, मंगळवेढा येथीलश्री. पुजारी, दिपक खार्डे यांनी आपले विचार व्यक्त केले. माजी आमदार डॉ. शशिकांतखेडेकर यांनी मागील काळात याठिकाणी केलेली विकासकामे सांगितली. हर्षवर्धन सपकाळयांनी हा जन्मोत्सव सोहळा लोकोत्सव होण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे संचलन श्री. जाधव यांनी केले.कार्यक्रमाला मोठ्या संख्येने पंचक्रोशीतील नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमापूर्वीपालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी संत चोखामेळा यांचे पूजन करून दर्शन घेतले.त्यानंतर मेहुणा राजा गावातील संत चोखामेळा यांच्या दिंडीमध्ये सहभागी होत त्यांचेपालखीचे दर्शन घेतले.
*****
नारायणखेड उपसा सिंचन योजनेचे पालकमंत्र्यांच्याहस्ते उद्घाटन
बुलडाणा, दि.14 : दे. राजातालुक्यातील खडकपूर्णा प्रकल्पातील डाव्या मुख्य कालव्यावरील नारायणखेड उपसा सिंचनयोजनेचे जलपूजन व उद्घाटन आज 14 जानेवारी 2020 रोजी पालकमंत्री डॉ. राजेंद्रशिंगणे यांच्याहस्ते करण्यात आले. सुरूवातीलानारायणखेड येथील वितरण कुंडामध्ये जलपूजन करून उपसा सिंचन योजनेच्या फलकाचे फितकापून अनावरण करण्यात आले. त्यानंतर पंपहाऊस, गावातील नळयोजनेचे उद्घाटन करण्यातआले. यावेळी पाटबंधारे विभागाचे अधिक्षक अभियंता नितीन सुपेकर, खडकपूर्णाप्रकल्पाचे कार्यकारी अभियंता महादेव कदम, उपअभियंता श्री. विश्वकर्मा, ॲड काझीआदींसह लोकप्रतिनिधी, पाटबंधारे विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. सदर उपसा सिंचन योजनेकरीता 115 अश्वशक्तीचे दोनपंप आहेत. या योजनेमुळे नारायणखेड, सरंबा, दे.मही, धोत्रा नंदई या गावातील लाभधारकांना सिंचनाचा लाभ होणार आहे. या योजनेतंर्गत 1019 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येते. सदरसिंचन 7.70 किलोमीटर लांबीचा मुख्य कालवा व 9 लघु कालव्यांद्वारे होते. याप्रसंगी नारायणखेड पाणी वापर संस्थेचे गजाननचेके, पंढरी गिते, शिवानंद मुंडे व अन्य लाभधारक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठीसहायक अभियंता योगेश कापडणीस, खडकपूर्णा प्रकल्पाचे जी. बी खोत, नितीन डोईफोडे,श्री. व्यवहारे, श्रीमती दिशा चिकटे, श्री. उईके, प्रकाश वीर, श्री. दोडके,श्री.बहुरे आदींसह अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. ******