डिझेल चोराचा शिराढोण पोलिसानी केला पर्दाफाश

0
1121
Google search engine
Google search engine

डिझेल चोराचा शिराढोण पोलिसानी केला पर्दाफाश

उस्मानाबाद /प्रतिनीधी

कळंब तालुक्यातील मंगरुळ येथील सुरेश भैरु जाधव यांच्या शेतातील विहीर खोदकामास आलेल्या एक्सकॅव्हेटर यंत्राच्या डिझल टाकीतील 207 लीटर डिझेल 14,904/- रुपये किंमतीचे दिनांक 14.01.2020 रोजी 22.30 ते रोजी 07.00 वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्याने चोरुन नेले. अशा मजकुराच्या यंत्र मालक युनूस सय्यद यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दिनांक 15.01.2020 रोजी नोंदवण्यात आला होता.दरम्यान तात्काळ शिराढोण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक गुरमे यांनी तपास पथक नेमुन डिझेल चोराचा शोध घेऊन या प्रकरणी ऐक जणाला इंडिका सह ताब्यात घेऊन डिझेलही जप्त केले आहे.या प्रकरणाचा पुढिल तपास शौकत पठाण हे करत आहेत. शिराढोण पोलिसांनी तात्काळ तपास केल्यामुळे सर्वत्र पोलीसांचे अभिनंदन केले जात आहे.