चाकू हल्ला करणाऱ्या मुख्य आरोपीला अमरावती वरून अटक सहायक पोलीस निरीक्षक पंकज दाभाडे यांच्या टीम ची कार्यवाही

2568
जाहिरात

चाकू हल्ला करणाऱ्या मुख्य आरोपीला अमरावती वरून अटक
सहायक पोलीस निरीक्षक पंकज दाभाडे यांच्या टीम ची कार्यवाही

चांदुर बाजार /

दिनांक 16 जानेवारी पोलीस स्टेशन समोर झालेल्या चाकू हल्ल्यात दोन जण जखमी झाले होते.यामध्ये चाकू हल्ला करणारा आरोपी हा फरार झाला होता.त्याचा शोध घेण्यासाठी टीम तयार करून सहायक पोलिस निरीक्षक पंकज दाभाडे यांनी गुप्त माहिती च्या आधारे आरोपी याला अटक केली.

या गुन्ह्यातील मुख्य आरोपी मुजाहिद खान सलीम खान, वय 28 वर्ष, रा. रामभट प्लॉट चांदुर बाजार यास आज दि. 17/01/2020 रोजी दुपारचे 17.00 वा. शाल बिअर बार, कठोरा नाका येथून शिताफीने ताब्यात घेऊन सदर गुन्ह्यात 19.59 वा. अटक करण्यात आली.तर दोन आरोपी अध्यपही फरार आहे.

सदर कारवाई ही सोमय मुंडे साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी अचलपूर तसेच पोलीस निरीक्षक उदयसिग साळुंके साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि पंकज दाभाडे, सहायक पोलिस निरीक्षक अशोक कांबळे, पोहेकॉ कासदेकर, नापोकॉ भूषण पेटे, नापोकॉ सचिन डुकरे, पोकॉ पंकज फाटे, पोकॉ राजपाल यांनी केली आहे.

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।