शिरजगाव बंड येथे भरदिवसा महिलेची हत्या; आरोपी फरार; पोलिस घटनास्थळी दाखल

0
5237
Google search engine
Google search engine

शिरजगाव बंड येथे भरदिवसा महिलेची हत्या; आरोपी फरार; पोलिस घटनास्थळी दाखल

चांदूर बाजार –

तालुक्यातील शिरजगाव बंड येथे एका ४० वर्षीय महिलेला घरात घुसून धारदार शास्त्राने वार करून ठार करण्यात आले. यात महिलेचा जागीच मृत्यू झाला.
तालुक्यातील शिरसगाव बँड गावात गणपत बाबा मंदिराजवळ राहणाऱ्या ४० वर्षीय महिला संगीता विकास झटाले यांच्या घरात घुसून अज्ञात ने धारदार शस्त्राने ६ वार केले. यात महिला जागीच ठार झाली. ही घटना गावात आगीसारखी पसरली. घटनेची माहिती परिसरातील नागरिकांनी स्थानिक पोलिस स्टेशनला दिली.
घटनेचे कारण कळू शकले नसून याप्रकरणी मृत संगीता झटाले चा मुलगा पवन विकास झटाले यांनी तक्रार दाखल केली आहे. या घटनेतील आरोपी फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. वृत्त लिहेस्तोवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला नवहता. घटनेनंतर पोलिसांनी शवविच्छेदन करीता ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते.
या घटनेचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी पोपट अबदगिरे यांचा मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक उदयसिंह साळुंके,सहायक पोलीस निरीक्षक तेजस्विनी गिरसावडे , पोलीस कॉस्टबल विनोद इंगळे ,पोलिस शिपाई प्रशांत भटकर, वीरेंद्र अमृतकर करीत आहे. या घटनेमुळे शिराजगाव बंड परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून निरनिराळ्या चर्चेला उधाण आले होते.