*बहिरम यात्रेत अल्पवयीन मुलीचे छेड काढणाऱ्या अटक,* _________________________________ *पॉस्को गुन्हची नोंद,तर पोलिसांना सुद्धा धक्काबुक्की* ___________________________________________

4731
जाहिरात

*बहिरम यात्रेत अल्पवयीन मुलीचे छेड काढणाऱ्या अटक,*
_________________________________
*पॉस्को गुन्हची नोंद,तर पोलिसांना सुद्धा धक्काबुक्की*
___________________________________________

चांदूर बाजार /तालुका प्रतिनिधी

विदर्भातील सुप्रसिद्ध असलेल्या बहिरम यात्रे मध्ये ढोलकी वाजविणार्या अल्पवयीन मुलीची छेड काढल्या प्रकरणी चार आरोपी यांना अटक करण्यात आली असून या मध्ये पोलिसांना सुद्धा धक्काबुक्की करण्यात आली मात्र आरोपीवर गुन्ह्याची नोंद न करण्यात आल्याने चर्चेला उधाण आले.ही घटना तालुक्यातील शिरजगाव कसबा पोलीस स्टेशन मध्ये करण्यात आली आहे.

दिनांक 16 जानेवारी ला रात्री 8 च्या दरम्यान बहिरम या ठिकाणी विशाल बंड रा.खरवाडी वय 29 वर्ष, निखिल घुलक्षे रा.सर्फापूर,शिशिर ठाकरे वय 28वर्ष रा.शिवाजी नगर चांदुर बाजार,योगेश इशळ वय 32 वर्ष रा.गणोजा ,अधिक एक असे बहिरम या ठिकाणी आले होते.त्या ठिकाणी भगवानबाबा मंदिर परिसरात अतुल कविटकर यांच्या राहुटी मध्ये त्यांनी ढोलकी वाजविणार्या परप्रांतीय महिलेला गाण्याची फर्माईश केली.त्यांना महिलेच्या तक्रार नुसार त्यांनि गाणे गात असताना आपली विनाकारण बडबड सुरू केली.तसेच वाईट इशारे देखील केले.तसेच मुलीला पकडले तिने प्रतिकार करत तेथून पळ काढला आणि आपल्या आई वडिलांसोबत बहिरम येथे पोलिस चौकी गाठून सर्व हकीकत सांगितले.

त्यानंतर विशाल आणि त्यांचे मित्रपाच जण त्या परप्रांतीय कुटुंब चे वास्तव असलेल्या रेस्ट हाऊस च्या असलेल्या बाजूच्या ठिकाणी पोहचेले आणि अपमानास्पद शब्दाचा उच्चर केला आणि पोलिसांना सुद्धा धक्काबुक्की केली. पोलीसानी त्यांना तात्काळ त्यांना ताब्यात घेऊन वाहनमध्ये बसवून शिरजगाव पोलीस स्टेशन येथे आणले.त्या ठिकाणी गुन्हे दाखल केले वर त्यांना दिनांक 17 जानेवारी शुक्रवारी दुपारी 4 ते 5 च्या दरम्यान अचलपूर न्यायालयात हजर केले असता त्यांना 23 पर्यत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.असून चारही आरोपी याना अटक करणयात यश आले तर फरार असलेल्या आरोपीचा शोध पोलिस घेत आहे.

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।