ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांच्या गाडीला अपघात

0
1278
Google search engine
Google search engine

ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांच्या गाडीला अपघात झाला आहे. खालापूर टोलनाक्याजवळ हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. शबाना आझमी यांना प्राथमिक उपचारासाठी पनवेलमधील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा अपघात घडला तेव्हा त्यांच्यसोबत गाडीमध्ये जावेद अख्तरदेखील गाडीत होते. मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर कार आणि ट्रक यांच्यात धडक झाली.