उस्मानाबादच्या बी.डि.ओ.कडून सारोळा ,शिंदेवाडीत विकास कामांची पहाणी

200
जाहिरात

सारोळा, शिंदेवाडी येथे गटविकास अधिकाऱ्यांची भेट

उस्मानाबाद: तालुक्यातील सारोळा (बुद्रूक) व शिंदेवाडी येथे सुरू असलेल्या विविध विकास कामांना पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी समृध्दी दिवाणे यांनी भेट देवून पाहणी केली.
सारोळा येथील तीन अंगणवाड्यांना दिवाणे यांनी भेट देवून चिमुकल्यांशी संवाद साधला. तसेच ॲरो प्लॅन्टच्या कामासही भेट दिली. शिंदेवाडी येथे रोजगार हमी योजनेतून करण्यात येत असलेल्या सार्वजनिक पाणीपुरवठा विहिरीच्या कामासही त्यांनी भेट दिली. यावेळी ग्रामपंचायत सदस्य विनोद बाकले, नितीन पाटील, सुधाकर देवगिरे, ग्रामविकास अधिकारी वाय.बी मुंडे, पांडूरंग रणदिवे, दत्ता बगाडे, शैलेश शिंदे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.