येडशी येथे महामार्ग पोलींसानी घेतले रक्तदान शिबीर

0
1025
Google search engine
Google search engine

येडशी येथे महामार्ग पोलींसानी घेतले रक्तदान शिबीर

उस्मानाबाद / प्रतिनीधी

उस्मानाबाद तालुक्यातील येडशी येथील टोलनाक्यावर महामार्ग पोलीस केंद्रातर्फे रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबीराचे उदघाटन उस्मानाबादचे उप विभागीय पोलीस अधिकारी मोतिचंद राठोड यांच्या हस्ते करण्यात आले.

३१ वा रस्ता सुरक्षा निमित्ताने
उस्मानाबाद तालुक्यातील येडशी येथील टोलनाक्यावर महामार्ग पोलीस केंद्र उस्मानाबाद यांच्या वतीने रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.या राक्तदान शिबीराचे उदघाटन उस्मानाबादचे उप विभागीय पोलीस अधीकारी मोतीचंद राठोड व पोलिस निरीक्षक दत्तात्रय सुरवसे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी मोतीचंद राठोड यांनी वाहनधारकांना व चालकांना रक्त दान करण्याबाबत ,वाहतूक सुरळीत करण्याबाबत योग्य प्रकारे मार्गदर्शन केले.या कार्यक्रमासाठी परिसारातील पत्रकार व पोलीस कर्मचारी सहाय्यक पोलीस निरीक्षक जयंत गादेकर ,उप निरिक्षक राजेंद्र बोरवटीकर ,बालाजी गिरी ,कपील बोरकर , उमाकांत राऊत ,मधुकर शेवाळे,विजय गणापूरे , मयुर फुलवरे ,तानाजी पवार ,यांनी विशेष परिश्रम घेतले.