उद्या मातोश्री त्रिवेणी बोंडे यांच्या स्मृतीदिनानिमित्त दिव्यांग साहित्य वितरण सोहळा – खासदार रामदासजी तडस व माजी कृषिमंत्री अनिलजी बोंडे यांच्या हस्ते होणार वितरण

0
554
Google search engine
Google search engine

वरुड:-

माजी कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांच्या मातोश्री त्रिवेणिताई बोंडे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ वरुड मोर्शी तालुक्यातील अपंग बांधवाना साहित्य वितरण सोहळा शुक्रवार दिनांक 24 जानेवारी ला सकाळी 10 वाजता माजी कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांच्या वरुड येथील निवासस्थानी पार पडणार आहे.

या कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून खासदार रामदासजी तडस, अध्यक्ष म्हणून माजी कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे, प्रमुख अतिथी म्हणून डॉ. वसुधा बोंडे, वरूडच्या नगराध्यक्षा स्वातीताई आंडे, शेंदूरजाघाट चे नगराध्यक्ष रुपेशजी मांडवे, भाजपा दिव्यांग सेल जिल्हाध्यक्ष बाळासाहेब कान्होलीकर, भाजप वरुड तालुकाध्यक्ष राजकुमार राऊत, भाजप मोर्शी तालुकाध्यक्ष अजय आगरकर, वरुड शहराध्यक्ष राजू सुपले, मोर्शी शहराध्यक्ष निलेश चौधरी, शेंदूरजनघाट शहराध्यक्ष निलेश फुटाणे, अंजली तुमराम प. स. सदस्य, चैताली ठाकरे प. स. सदस्य, ललीताताई लांडगे प. स. सदस्य, भाजयुमो तालुकाध्यक्ष मनोजदादा माहुलकर, शहराध्यक्ष निलेश अधव, भाजपा तालुकाध्यक्ष मोर्शी अजय आगरकर, मोर्शी नगर परिषदेचे उपाध्यक्ष आप्पासाहेब गेडाम, भाजयुमो शहराध्यक्ष उमेश गोरडे, तालुकाध्यक्ष राहुल चौधरी, पंचायत समिती सभापती यादवराव चोपडे, उपसभापती मायाताई वानखडे, सदस्य सुनील कडू, रमेश खातदेव, शंकर उईके,जिल्हा परिषद सदस्य संजय घुलक्षे, सारंग खोडस्कर, अनिल डबरासे, शरद मोहोड, भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष रविराज पुरी, अक्षय इंगळे शहराध्यक्ष शेंदुरजनाघाट
भाजपा महिला तालुकाध्यक्ष वंदनाताई तिडके, ज्योतिताई कुकडे, शहराध्यक्ष मायाताई बासुंदे, मधुरिताई भगत, निलिमाताई कुबडे,
अलीम्कोचे सन्जॉय मंडल, दिव्यांग आघाडी वरुड चे गजानन खडसे, मोर्शीचे नरेंद्र लांडे उपस्थित राहणार आहेत.
वरुड येथे सप्टेंबर 2019 मध्ये तत्कालीन कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे व खासदार रामदासजी तडस यांच्या प्रयत्नामुळे वरुड व मोर्शी तालुक्यातील दिव्यांग बांधवांची तपासणी करण्यात आली होती. त्यात 561 दिव्यांग बांधवाना त्यांना लागणारे साहित्य वितरण सोहळा भाजपा वरुड च्या वतीने आयोजित करण्यात आला आहे. तरी सर्व लाभार्थी बांधवांनी शुक्रवार दिनांक 24 जानेवारी 2020 ला सकाळी 10 वा डॉ अनिल बोंडे यांचे निवासस्थानी, शासकीय विश्रामगृह मागे, वरुड येथे होणाऱ्या या सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजक तर्फे करण्यात आले आहे.