मा.ना.पंकजा गोपीनाथ मुंडे करणार ” मराठवाडा तील पाणी प्रश्न ” या विषया वरून २७ जानेवारी रोजी औरंगाबाद येथे लाक्षणिक उपोषण.

0
876

t

प्रतिनिधी:- दिपक गित्ते

दि २३- मराठवाडा विभागात दिवसेंदिवस पावसाचे प्रमाण अत्यल्प होत आहे, परिणामी या भागातील शेतकरी व सर्व सामान्य नागरिकांना नेहमीच पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे, ज्यामुळे शेती व उद्योग, व्यवसाय संकटात सापडले आहेत. या भागाला दुष्काळाच्या चक्रव्युहातून बाहेर काढण्यासाठी आमच्या सरकारने ‘जलयुक्त शिवार ‘ योजना यशस्वीपणे राबवली होती, त्याचा चांगला परिणाम झाला आणि भूगर्भातील पाणी पातळीत वाढ होऊन शेतक-यांना मोठा फायदा झाला होता, परंतु प्रत्येक वर्षी ही परिस्थिती कायम राहतेच असे नाही.

मराठवाड्यातील धरणे पांच वर्षातून एखाद्या वर्षी भरतात, इतर वेळी धरणे धरणे कोरडी पडल्याने अवर्षणाची स्थिती असते. सिंचनाची खात्रीशीर सोय उपलब्ध नसल्याने हा भाग कायम दुष्काळी असतो. नाशिक जिल्ह्यात पडणा-या पावसाचे अंदाजे १० हजार ४५४ दलघमी पाणी पश्चिम वाहिनी नद्यांद्वारे समुद्राकडे वाहून जाते तसेच जायकवाडी प्रकल्पाच्या वरील बाजूस ६२३ लहान-मोठी धरणे असल्यामुळे जायकवाडी प्रकल्प देखील प्रत्येक वर्षी पुर्ण क्षमतेने भरत नाही. यासाठी पश्चिम वाहिनी नद्यांचे समुद्राकडे वाहून जाणारे ३ हजार १७८ दलघमी पाणी गोदावरी खो-यात आणणे प्रस्तावित आहे, यापैकी ५७० दलघमी पाणी जायकवाडी धरणस्थळी उपलब्ध करून दिल्यास त्याचा फायदा दुष्काळग्रस्त मराठवाड्याला होईल.

१) कोकण विभागातील दमनगंगा, नारपार, पिंजाळ व वैतरणा खोऱ्यात २६४ टीएमसी  पाणी उपलब्ध असून त्यातून ११५ टीएमसी पाणी अप्पर वैतरणा धरणामार्फत गोदावरी खोऱ्यात स्थलांतरीत करता येते.

२) जायकवाडी धरण, वॉटर ग्रीडसाठी ३५ टीएमसी  पाणी वापरुन ८० टीएमसी पाणी औरंगाबाद, जालना,बीड आदी जिल्हयात वापरता येईल.

३) कृष्णा खोऱ्यातील ५८५ टीएमसी पाणी महाराष्ट्रात वापरण्याची परवानगी लवाद क्रमांक १ नुसार शासनास मिळाली आहे.  मराठवाड्याचा ८.४ टक्के भाग कृष्णा खो-यात येत असल्यामुळे  उस्मानाबाद  व  बीड जिल्हयात ४९.१ टीएमसी पाणी  वापरण्याचा  हक्क मराठवाडयाला पोहचतो परंतु, आजपर्यंत फक्त २५.४ टीएमसी  पाणी मिळाले, २३.७ टीएमसी पाणी मिळणे बाकी आहे.

४)सन १९८० च्या लवादानुसार गोदावरी खो-यातून पोलावरम प्रकल्पाकरीता कृष्णा खोऱ्यात ८० टीएमसी पाणी देताना महाराष्ट्राच्या वाट्याचे १४ टीएमसी आणि कर्नाटकाचे २१ टीएमसी असे एकूण ३५ टीएमसी पाणी देण्याची तरतूद गोदावरी लवादात आहे.  शिवाय हे पाणी नागार्जुन सागर धरणाच्या वरील भागातून महाराष्ट्राने परत घ्यावयाचे आहे, त्यामुळे लवाद तरतुदीनुसार हे १४ टीएमसी पाणी कृय्णा खोऱ्यातून गोदावरी खोऱ्यात लातूर, बीड, उस्मानाबाद या अवर्षण प्रवण जिल्हयात मिळणे आवश्यक आहे.

*आमच्या मागण्या*
———————
१. मराठवाड्याला हक्काचे पाणी द्यावे व या भागातील शेतकरी व सर्व सामान्य माणसाला दुष्काळाच्या जोखडातून बाहेर काढावे.
२. शासनाने अमरावती विभागाला सन 2010 पासून आजपर्यंत सिंचन निर्मुलनासाठी रू. ६८९८ कोटी अनुदान दिले. त्यानुसार मराठवाडा विभागाचा सिंचन अनुशेष दूर करण्यासाठी सन २०२० – २१ पासून दरवर्षी रू.१००० कोटी अतिरिक्त द्यावे.
३. जलयुक्त शिवार योजना पुन्हा प्रभावीपणे व जलदगतीने राबविण्यात यावी.
४. महत्वाकांक्षी अशा मराठवाडा वाॅटरग्रीड प्रकल्पाचे काम तातडीने सुरू करून अकरा धरणे एकमेकांना लूप पध्दतीने जोडावे.
५. मराठवाड्यातील पाण्याची तुट भरून काढण्यासाठी मागील युती शासनाने दि.२३ /०८/२०१९ रोजी जाहीर केलेल्या निर्णयानुसार कोकणातून १६८ अ.घ.फूट पाणी मराठवाड्यात आणण्यासाठी त्वरित कार्यवाही व्हावी.
६. जायकवाडीत उपलब्ध होणारे पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी समांतर प्रवाही कालव्याद्वारे सिंधफणा, वाण उप खो-यांना सोडावे.
७. मराठवाड्याचा सिंचन अनुशेष व पाण्याची तुट भरून काढावी तसेच गेल्या काही वर्षापासून या भागाला देय असलेले अनुशेष अनुदान तातडीने द्यावे.
८. बीड जिल्हयाच्या आरक्षित पाण्याचा प्रश्न तात्काळ सोडवावा

आदी मागण्यांची सोडवणूक करण्यासाठी मा.ना.पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी येत्या २७ जानेवारी २०२० रोजी सकाळी १० वा. आपल्या कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करणार आहोत.