सैन्य दलातर्फे खेळतांना आतापर्यंत मिळवले ९ “सुवर्ण” व एक “कास्य” पदक
आकोटःसंतोष विणके
ऊन, पाऊस, थंडीची तमा न बाळगता सैन्यदलात सर्वोत्कृष्ट सेवा बजावत जिल्ह्यातील भुमिपुत्र कुलदिप गणेशपुरे यांनी सैन्य सेवेत वह्राडच्या मातीचा ठसा उमटवला आहे. त्यांच्या सेवेबद्दल सैन्यदलाने त्यांना ‘आर्मी कमेंडेशन मेडल’ जाहीर केले आहे.
मुर्तीजापुर तालुक्यातील भगोरा येथील कुलदिप गणेशपुरे यांनी ४ थी पर्यत गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेतले.आहे.
संत गाडगे बाबा महाविद्यालय मुर्तीजापुर ला १२वी नंतर त्यांचा . सैन्यदलात काम करण्याचा त्यांचा मानस होता. त्यादृष्टीने त्यांनी एन.सी.सी. व स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली. त्यांना २०१४ मध्ये परीक्षेत यश मिळाले. त्यांची भारतीय सैन्यदलात निवड झाली.
सामान्य कुटुंबात जन्मलेले कुलदिप यांचे आई वडील शेतकरी आहेत.
त्यांचा फौजी जिवनात खेळाकडे जास्त रस होता. सर्वात कमी कारकीर्दीत, त्यांना बटालीयन, ब्रिगेड, कोर कमांड स्तरांवर २०१९ -२० साली फ्री स्टाईल स्ट्रोक ४०० मीटर, ८००मीटर, व १५०० मीटर जलतरण स्पर्धेमधे एकुन ९ “सुवर्ण” व एक “कास्य” पदक मिळाले. आणि त्यांचा या करीता बटालीयन स्तरावर सीओ “प्रशंसा पत्र” प्रदान करून गौरव करण्यात आला.
आता त्यांना उपसेना प्रमुख यांच्याकडुन प्रशंसा पञ देऊन त्यांचा सत्कार करण्यात. येणार आहे.
आज कुलदिप राजेंद्र गणेशपुरे यांच्या कठोर परिश्रम आणि समर्पणाबद्दल त्यांना आर्मी प्रशंसा पदक देण्यात आले.
“दि शिख लाईट इन्फेंट्री” फतेहगड येथील खडतर प्रशिक्षण पूर्ण करून त्यांनी सेवेची सुरुवात जम्मू-काश्मीर येथील राजौरी, पूंछ, नारिया अशा संवेदनशील ठिकाणी यशस्वीरित्या पूर्ण केली. त्यानंतर त्यांची पंजाब येथे बदली झाली. या ठीकाणी त्यांनी जलतरण स्पर्धेमधे सहभाग घेतला. सिकंदराबाद येथे त्यांनी जलतरण चा अभ्यास केला. त्यानंतर त्यांना जालंदर ला “जलतरण” खेळामधे संधी मिळाली. येथे त्यांनी बटािलयन कमांडटरांच्या आदेशानुसार यशस्वीरीत्या असाधारण कामगीरी केली.विभाग तसेच बटालियमधून गणेशपुरे यांची सर्वोत्कृष्ट सेवा दिल्याबद्दल निवड झाली.
त्यांना आर्मी कमेंडेशन मेडल’ जाहीर करण्यात आले. असून त्यांना उपसेनाप्रमुख लेफ्टनंट जनरल यांच्यातर्फे ते लवकरच देण्यात येणार आहे. त्यांच्या फौजी जिवनातील पहीला सैन्य पुरस्कार
Vice Chief of the Army Staff Commendation Card
सैन्य शाखांच्या सर्व तिन्ही शाखांमध्ये प्रशंसा पत्रे देण्याची प्रथा आहे, जी स्वतंत्रपणे केलेल्या कामांसाठी किंवा विशिष्ट सेवेसाठी किंवा कामकाजाच्या कर्तव्याची निष्ठा दर्शविणारे प्रशस्ति पत्र आहेत. हा एक प्रकारचा शौर्य पुरस्कार आहे. ज्यांनी विविध क्षेत्रात विशिष्ट कार्य केले आहे त्यांना हा पुरस्कार प्रदान केला जातो.