*माझे संपूर्ण जीवन हे सेवेकरिताच – माजी कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे*

0
761

 

*मातोश्री त्रिवेणी बोंडे यांच्या स्मृतीदिनानिमित्त दिव्यांग मोफत साहित्य वितरण सोहळा संपन्न*

*वरुड:-*

माजी कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांच्या मातोश्री त्रिवेणिताई बोंडे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ वरुड व मोर्शी तालुक्यातील अपंग बांधवाना साहित्य वितरण सोहळा आज सकाळी 10 वाजता माजी कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांच्या वरुड येथील निवासस्थानी पार पडला.

या कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून माजी कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे, प्रमुख अतिथी म्हणून डॉ. वसुधा बोंडे, वरूडच्या नगराध्यक्षा स्वातीताई आंडे, शेंदूरजाघाट चे नगराध्यक्ष रुपेशजी मांडवे, भाजपा दिव्यांग सेल जिल्हाध्यक्ष बाळासाहेब कान्होलीकर, भाजप वरुड तालुकाध्यक्ष राजकुमार राऊत, भाजप मोर्शी तालुकाध्यक्ष अजय आगरकर, वरुड शहराध्यक्ष राजू सुपले, मोर्शी शहराध्यक्ष निलेश चौधरी, शेंदूरजनघाट शहराध्यक्ष निलेश फुटाणे, अंजली तुमराम प. स. सदस्य, चैताली ठाकरे प. स. सदस्य, ललीताताई लांडगे प. स. सदस्य, भाजयुमो तालुकाध्यक्ष मनोजदादा माहुलकर, भाजपा तालुकाध्यक्ष मोर्शी अजय आगरकर, मोर्शी नगर परिषदेचे उपाध्यक्ष आप्पासाहेब गेडाम, भाजयुमो शहराध्यक्ष उमेश गोरडे, तालुकाध्यक्ष राहुल चौधरी, पंचायत समिती सभापती यादवराव चोपडे, उपसभापती मायाताई वानखडे, सदस्य सुनील कडू, रमेश खातदेव, शंकर उईके,जिल्हा परिषद सदस्य संजय घुलक्षे, सारंग खोडस्कर, अनिल डबरासे, शरद मोहोड, भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष रविराज पुरी, भाजपा महिला तालुकाध्यक्ष वंदनाताई तिडके, प्रतिभाताई राऊत, ज्योतिताई कुकडे, शहराध्यक्ष मायाताई बासुंदे, मधुरिताई भगत, निलिमाताई कुबडे, डॉ. महेंद्र राऊत, डॉ. रुपाली जैन, डॉ. प्रवीण चौधरी, डॉ. राजोरीया,
अलीम्कोचे सन्जॉय मंडल, जायट्स ग्रुप चे अध्यक्ष योगेश्वर खासबागे, दिलीप टाकरखेडे, दिव्यांग आघाडी वरुड चे गजानन खडसे, मोर्शीचे नरेंद्र लांडे उपस्थित राहणार आहेत.
वरुड येथे १ सप्टेंबर 2019 ला तत्कालीन कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे व खासदार रामदासजी तडस यांच्या प्रयत्नामुळे वरुड व मोर्शी तालुक्यातील दिव्यांग बांधवांची तपासणी करण्यात आली होती . त्यात 561 दिव्यांग बांधवाना त्याचा आज लाभ देण्यात आला जवळजवळ 49 लक्ष रुपयांच्या साहित्याचे वितरण आज माजी कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांचे हस्ते पार पडला
या प्रसंगी डॉ. अनिल बोंडे यांनी म्हटले, आज माझ्या आईच्या स्मृतीदिनानिमित्त आज मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या मदतीने आज 49 लक्ष रुपयाच्या 561 दिव्यांग बांधवाना लाभ देता आहे, आज माझ्याकडे कोणतेही पद नाही आमदारकी नाही, कुठेतरी मी कमी पडलो परंतु माझे संपूर्ण जीवन हे सेवेकरिताच आहे, आणि ही सेवा मी श्वासाच्या अंतापर्यत अविरत राहील. असा विश्वास उपस्थित बांधवाना दिला.