त्या हल्लेखोर भाजपा पदाधिकाऱ्याला एक दिवसाचा पीसीआर : चांदूर रेल्वेतील बाप – लेकींवर हल्ला प्रकरण

0
1881
Google search engine
Google search engine
अन्य आरोपी फरारीतच
चांदूर रेल्वे –
चांदूर रेल्वे शहरातील मंगलमुर्ती नगर येथील दोन परिवारात झालेल्या आपसी वादात बाप – लेकी जखमी झाल्या होत्या. ही घटना गुरूवारी सायंकाळी ४ ते ४.३० वाजताच्या दरम्यान घडली होती. यामधील अटक आरोपी चांदूर रेल्वे भाजपा शहर सरचिटणीस हरिष वऱ्हाडे याला  शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असुन अन्य आरोपी अजुनही पसारच आहे.
आरोपी हरिष बबनराव वऱ्हाडे (वय ४५) रा. मंगलमुर्ती नगर व फिर्यादी सौ. रत्नमाला शंकरराव अंबुलकर (वय ३४) रा. शिरजगाव मोझरी यांचे वडील शेषराव गुल्हाणे (वय ७०) हे आजुबाजुनेच राहत  असून आरोपीच्या पत्नीने शेषराव गुल्हाने यांना कायतोंड्या असे म्हटल्यानंतर फिर्यादी रत्नमाला अंबुलकर यांनी तू माझे वडीलास असे का बोलले असे विचारले असता त्यांना मारहाण केली. व नंतर आरोपी हरिष वऱ्हाडे हिच्या पत्नीने यवतमाळ येथून तिचा भाऊ आरोपी प्रमोद कृष्णराव राऊत याला बोलावून त्याच्या सोबत आलेल्या काही लोकांनी व आरोपीने फिर्यादीचे वडील शेषराव गुल्हाणे यांना त्यांच्या घरात घुसून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. व फिर्यादी रत्नमाला अंबुलकर हिला वीट मारून जखमी केले. अशा आशयाच्या तक्रारीवरून चांदूर रेल्वे पोलीसांनी आरोपी हरिष वऱ्हाडे, त्याची पत्नी व प्रमोद राऊत (यवतमाळ) यांच्यासह इतर अज्ञात आरोपींवर कलम १४३, १४७, ४५२, ३३६, ३२४ भादंवी अन्वये गुन्हा दाखल केला होता. यामध्ये अटक आरोपी हरिष वऱ्हाडे याला शुक्रवारी चांदूर रेल्वे न्यायालयात पोलीसांनी हजर केले होते. यामध्ये त्याला एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
अन्य आरोपी अजुनही पसारच
या प्रकरणात आरोपी हरिष वऱ्हाडे यांच्यासह इतर ८ ते १० आरोपी असण्याची शक्यता आहे. परंतु अजुनपर्यंत केवळ एका आरोपीला अटक करण्यात आली असुन इतर आरोपी पसारच आहे. अन्य आरोपींचा पोलीस शोध घेत असुन पुढील तपास ठाणेदार संतोष भंडारे यांच्या मार्गदर्शनात एएसआय जाधव करीत आहे.